‘पॉ पेट्रोल: द डायनो मूव्ही’बद्दल जाणून घ्या सर्वकाही; 21 ऑगस्टला भारतात होणार प्रदर्शित
PAW Patrol: The Dino Movie ची कथा आता थेट डायनासोरच्या युगात पोहोचणार आहे. हा चित्रपट 21 ऑगस्ट रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Know everything about ‘PAW Patrol: The Dino Movie’; releasing in India on August 21 : जगभरातील मुलांच्या मनोरंजन विश्वातील लोकप्रिय फ्रँचायझींपैकी एक असलेल्या पॉ पेट्रोलने आपल्या दमदार आणि मनोरंजक कथांमुळे मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. रंगीबेरंगी पात्रे, लक्षात राहणारे संवाद आणि रोमांचक रेस्क्यू मिशन्समुळे या मालिकेने अनेक पिढ्यांमधील मुलांचे मनोरंजन केले आहे. गेल्या दशकभरात रेस्क्यू मिशनसोबतच मुलांना मैत्री, धैर्य आणि जीवनातील महत्त्वाचे धडे देणाऱ्या ‘पॉ पेट्रोल’ची कथा आता थेट डायनासोरच्या युगात पोहोचणार आहे. ‘पॉ पेट्रोल: द डायनो मूव्ही’ हा चित्रपट 21 ऑगस्ट रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
‘पॉ पेट्रोल’च्या पिल्लांचा जहाजातून प्रवास सुरू असताना ते एका भीषण वादळात सापडतात. त्यांचे जहाज एका अशा अज्ञात बेटावर जाऊन आदळते, जिथे आजही डायनासोर जिवंत आहेत. पृथ्वीवर डायनासोर कधीच नामशेष न झाल्याचे हे एकमेव ठिकाण असल्याचे दाखवण्यात आले आहे.
इराणसोबतच्या युद्धामुळे अमेरिकेपुढे मोठे संरक्षण संकट; आता डोनाल्ड ट्रम्पवर खासदार नाराज
या बेटावर त्यांची भेट रेक्स या पिल्लाशी होते. अनेक वर्षांपासून बेटावर अडकून राहिलेला रेक्स आता तिथल्या डायनासोरचा तज्ज्ञ बनला आहे. त्याने बेटावर स्वतःसाठी एका झाडावर घरही तयार केले आहे. दरम्यान, ‘पॉ पेट्रोल’चा जुना प्रतिस्पर्धी मेयर ह्युमडिंगर बेटावरील डोंगरांमध्ये हिऱ्यांच्या शोधासाठी दाखल होतो. त्याच्या बेफाम खाणकामामुळे सुप्त ज्वालामुखी पुन्हा सक्रिय होतो. त्यानंतर पॉ पेट्रोलसमोर आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ‘डायनो-साइज’ रेस्क्यू मोहीम उभी राहते.
कोण आहेत हे धाडसी पप्पीज?
या चित्रपटात रायडरच्या भूमिकेसाठी हेन्री बोलनने आवाज दिला आहे. त्याचा हा पहिलाच फीचर व्हॉइस रोल आहे. त्याच्यासोबत मार्शलच्या भूमिकेत कार्टर यंग, स्कायच्या भूमिकेत मॅकेना ग्रेस, रबलच्या भूमिकेत ल्युशियन डंकन-रीड, चेसच्या भूमिकेत रेन जंजुआ, रॉकीच्या भूमिकेत विल्यम डेस्रोझियर्स आणि झुमाच्या भूमिकेत नायलन पार्थिपन आवाज देत आहेत.
30 वर्षांखालील नव्या फिल्ममेकर्सना मोठं व्यासपीठ; एक्सेल एंटरटेनमेंटने सुरू केलं ‘एक्सेल ओरिजिन्स’
‘द मायटी मूव्ही’मधील स्कायची भूमिका साकारणारी मॅकेना ग्रेस हीच एकमेव कलाकार आहे, जी यापूर्वीची भूमिका पुन्हा साकारत आहे. यावेळी रेक्स या नव्या पात्राचीही टीममध्ये एंट्री झाली आहे. त्याला हेडन चेम्बर्लेनने आवाज दिला आहे. रेक्स हा बर्नीज माउंटन डॉग असून तो व्हीलचेअरचा वापर करतो. बेटावरील धोकादायक परिस्थितीत तो पॉ पेट्रोलच्या टीमला मार्गदर्शन करतो. विशेष म्हणजे, हेडन चेम्बर्लेन स्वतःही व्हीलचेअरचा वापर करतो. रेक्सच्या शारीरिक क्षमता आणि कल्पकतेचे चित्रण त्याच्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या खास असल्याचे त्याने सांगितले आहे. त्यामुळे ‘पॉ पेट्रोल’मध्ये दिव्यांगत्वाला अडथळा म्हणून नव्हे, तर नायकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग म्हणून दाखवण्याची परंपरा पुढे सुरू राहते.
चित्रपटात कोणते डायनासोर दिसणार?
मागील दोन चित्रपटांपेक्षा ‘द डायनो मूव्ही’ वेगळा ठरण्याचे प्रमुख कारण म्हणजे यात डायनासोरची मोठी दुनिया पाहायला मिळणार आहे. बेटावर टी-रेक्स, ट्रायसेराटॉप्स, स्टेगोसॉरस आणि ब्रॅकिओसॉरस यांसारखे डायनासोर पाहायला मिळतील. चित्रपटाचे दिग्दर्शक कॅल ब्रंकर यांच्या टीमने या प्राण्यांची हालचाल आणि शरीराची ठेवण अधिक वास्तववादी दिसावी यासाठी प्रत्यक्ष जीवाश्मशास्त्रज्ञांचा सल्ला घेतला आहे.
यातील दोन डायनासोर कथेत विशेष भूमिका बजावतात. रुबार्ब हा टी-रेक्सचा पिल्लू असून तो बेटावर मार्शलचा खास मित्र बनतो. त्याच्या हालचाली कुत्र्याच्या पिल्लासारख्या ठेवण्यात आल्या आहेत. दिग्दर्शकांच्या मते, रुबार्ब हा ‘सर्वात गोंडस डायनासोर’ ठरावा, असा प्रयत्न करण्यात आला आहे. दुसरा डायनासोर म्हणजे टिम्मी, जो मोठा झालेला टी-रेक्स आहे. तो रेक्सचा सततचा साथीदार असून बेटावर फिरताना त्याला सोबत करतो.
स्टार कलाकारांचीही मोठी फौज
रॉन पार्डो पुन्हा एकदा मेयर ह्युमडिंगरच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या 12 वर्षांपासून तो या पात्राला आवाज देत असून, या चित्रपटासह त्याचा या भूमिकेतील तिसरा चित्रपट आहे.तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ह्युमडिंगर बेटावरील हिरे शोधण्यासाठी हार्पर कटलेस आणि स्फोटक तज्ज्ञ अलिस्टर स्टोनवॉल यांची मदत घेतो. हार्परची भूमिका मेरिडिथ मॅकनील, तर अलिस्टरची भूमिका टेरी क्रूज साकारत आहेत.याशिवाय जेनिफर हडसन पत्रकार लिलियन लेड्सच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी बातमी मिळवण्याच्या प्रयत्नात ती बेटावर पोहोचते.फॉर्च्यून फिम्स्टर आणि जमीला जमील अनुक्रमे युजेनिया बन्सेन आणि हायडी पोथेसिस या वैज्ञानिकांच्या भूमिकेत आहेत. या दोघी बेटावरील डायनासोरचा अभ्यास करत असतात.
नवा दिवस, नवा विक्रम! ‘स्पायडर-मॅन’ भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट
बिल नाय, पॅरिस हिल्टन (नॅन्सीच्या भूमिकेत) आणि स्नूप डॉग (डेव्हच्या भूमिकेत) हे देखील या स्टारकास्टचा भाग आहेत.केवळ अॅक्शन नाही, तर महत्त्वाचा संदेशहीडायनासोर, साहस आणि रेस्क्यू मिशन्सचा थरार असला तरी ‘पॉ पेट्रोल’ची खरी ताकद असलेली मूल्ये या चित्रपटातही कायम ठेवण्यात आली आहेत.संघभावना, धैर्य, दयाळूपणा आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय इतरांना मदत करण्याची तयारी हे चित्रपटाचे मुख्य संदेश आहेत. याच मूल्यांमुळे ‘पॉ पेट्रोल’ केवळ मुलांमध्येच नाही, तर पालकांमध्येही लोकप्रिय ठरले आहे.‘पॉ पेट्रोल: द डायनो मूव्ही’ 21 ऑगस्टपासून भारतातील चित्रपटगृहांमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला एकत्र पाहता येईल अशा रोमांचक आणि धमाकेदार डायनासोर साहसासाठी सज्ज व्हा!