क्षितिज पटवर्धन यांच्या ‘भूमिका’ नाटकाने पटकावले तब्बल 7 पुरस्कार, वाचा, कुणाला कोणता पुरस्कार?
येथे अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच माझा स्पेशल पुरस्कार सोहळा संपन्न झाला. ‘सांगीतिक मेजवानीही उपस्थितांनी यावेळी अनुभवली.

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये आगळ्यावेगळ्या संमेलनांचे व विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन करत असतात. (Bhoomika Drama) यंदाही त्यांच्या संकल्पनेतील ‘असेही एक नाटय़संमेलन’ नुकतेच दिमाखात संपन्न झाले. या संमेलनात सध्या मराठी रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘भूमिका’ या नाटकाचा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा ‘माझा स्पेशल पुरस्कार‘ देऊन गौरव करण्यात आला.
यामध्ये सर्वोत्तम नाटक – भूमिका, लेखक –क्षितिज पटवर्धन, दिग्दर्शक – चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेता – सचिन खेडेकर, अभिनेत्री – समिधा गुरू, सहाय्यक अभिनेता – सुयश झुंजरके, नेपथ्य – प्रदीप मुळ्ये असे तब्बल सात पुरस्कार या नाटकाला मिळाले आहेत.
रंगकर्मी अशोक मुळ्ये यांचा ‘माझा पुरस्कार’ हा प्रत्येक कलाकारासाठी खास असतो मात्र आमच्या ‘भूमिका’ नाटकाला त्यांनी ‘माझा स्पेशल पुरस्कार’ अशी विशेष पुरस्काररूपी कौतुकाची थाप दिली आहे ती आमच्यासाठी खूप मोलाची असून या पुरस्कारामुळे आम्हांला उत्तम काम करण्याचं अधिक बळ मिळालं आहे अशी भावना ‘भूमिका’ नाटकाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केली.
येथे अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच माझा स्पेशल पुरस्कार सोहळा संपन्न झाला. ‘गाणी तुमच्या आवडीची’ ही सुरेल सांगीतिक मेजवानीही उपस्थितांनी यावेळी अनुभवली. यावेळी कला क्षेत्रातील अनेक लोकांनी या सर्व कार्यक्रमाचा आनंद लुटला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.