पुण्या-मुंबईत येतोय, जमलं तर शिंदेंना दुर्लक्ष करायला सांगा; फडणवीसांनी औकात काढताच कुणाल कामराचा टोला

Kunal Kamra Criticise Devendra Fadanvis on his Interview : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने (Kunal Kamra) गाणं म्हटल्याने राज्यातील राजकारणात नवीन वाद निर्माण झाला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इंडियन एक्सप्रेसने घेतलेल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात फडणवीसांनी कामराची औकात काढली. त्यावर आता कामराने थेट ट्विट करत फडणवीसांना टोला लगावला आहे.
ब्रेकिंग : वैष्णवी हगवणे प्रकरण भोवलं; IG जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाचा दणका; कार्यभार काढला
काय म्हणाला कुणाल कामरा?
फडणवीसांच्या टीकेला उत्तर देणाऱ्या पोस्टमध्ये कुणाल कामराने म्हटले की, हॅलो देवेंद्र फडणवीस तुम्ही बरोबर आहात. राजकीय दृष्ट्या माझ्याकडे दुर्लक्ष केलेलच चांगले. कारण माझी औकात नाही. माझा कार्यक्रमा काय केवळ चार लोक पाहतात. त्यामुळे कृपया मला दुर्लक्षित कराल का ? कारण ऑक्टोबरमध्ये माझे ठाणे, नवी मुंबई, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये कार्यक्रम आहेत. तसेच शिंदेंना देखील जमलतर माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा. असं म्हणत कामराने थेट ट्विट करत फडणवीसांना टोला लगावला आहे.
Hello @Dev_Fadnavis you’re right,
Politically it’s better to ignore me.
I have no Aukad & only 4 people watch my show. Please can I be ignored?
October I was planning shows in
Thane – New Mumbai – Mumbai –
Pune – Nasik – Nagpur – Aurangabad
Please coordinate with Mr Shinde… pic.twitter.com/1yyho9Wtef— Kunal Kamra (@kunalkamra88) May 29, 2025
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इंडियन एक्सप्रेसने घेतलेल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस म्हणाले की, राजकीय दृष्ट्या म्हणाल तर या लोकांची औकात नाही. त्यामुळे त्यांच्या दुर्लक्ष करायला हवे. त्यांच्यावर बोलून तुम्ही त्यांची औकात वाढवता. त्यामुळे त्यांना दुर्लक्ष करणे चांगले आहे. मात्र शिवसेना असो किंवा भाजप आमचा पक्ष हा भावनिक असल्याने. लगेच तात्काळ प्रतिक्रिया येतात. मुरलेले राजकारणी नाहीत. मात्र माझं म्हणणं विचाराल तर अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे चांगले आहे. त्यांना चार लोक देखील ऐकत नाहीत.
पुणेकरांनो! वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांची पावती थेट एआय फाडणार
नेमकं प्रकरण काय?
एका कार्यक्रमात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने महाराष्ट्राच्या सध्या राजकारणावर एक कविता सादर केली. या कवितेच्या माध्यमांतून त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. त्याने आपल्या कवितेत म्हटले की, ‘ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, ऑख पर चष्मा….मेरी नजर से देखो तो गद्दार नजर आये….तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधातील गाण्यावरुन राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी महायुतीने या प्रकरणात कुणाल कामरा याला अटक करुन कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे तर महाविकास आघाडीकडून कुणाल कामरा याला समर्थन देण्यात येत आहे. तर कुणाल कामरा याने देखील या प्रकरणात माफी मागण्यास नकार दिला आहे. मी माफी मागणार नाही पण न्यायालयाने माफी मागण्यास सांगितली तर माफी मागेन असं कुणाल कामरा याने एका सोशल मीडिया पोस्टवर म्हटले आहे.