Oscars 2025 : किरण रावचं स्वप्न पूर्ण; ‘लापता लेडिज’ ची ऑस्करच्या स्पर्धेत भारताकडून ग्रँड एन्ट्री

  • Written By: Published:
Oscars 2025 : किरण रावचं स्वप्न पूर्ण; ‘लापता लेडिज’ ची ऑस्करच्या स्पर्धेत भारताकडून ग्रँड एन्ट्री

Kiran Rao’s Laapataa Ladies is India’s official entry for Oscars 2025 : ऑस्कर 2025 च्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर झाली असून, यात चित्रपट निर्माती असलेल्या किरण राव (Kiran Rao) यांचं स्वप्न पूर्ण झाले आहे. ऑस्कर स्पर्धेत ‘लापता लेडिज’ (Laapataa Ladies) चा अधिकृत समावेश करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी नामांकन मिळाले आहे.  ‘ॲनिमल’, राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळम चित्रपट ‘आट्टम’ आणि कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चर्चेत आलेला ‘ऑल वुई इमॅजिन इज लाइट’ या चित्रपटांना मागे टाकत ‘लापता लेडिज’ नं बाजी मारली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने सोमवारी (दि.23) ही घोषणा केली. किरण राव दिग्दर्शित या चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन आणि छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका असून, 97 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा 2 मार्च 2025 रोजी लॉस एंजेलिसमध्ये संपन्न होणार आहे.

…तर माझं स्वप्न पूर्ण होईल

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना किरण राव म्हणाल्या होत्या की, ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ऑस्करच्या (Oscar) शर्यतीत सामील व्हावा, अशी माझी इच्छा आहे. हा चित्रपट ऑस्करला गेला तर माझे स्वप्न पूर्ण होईल’, असे किरण राव यांनी म्हटले होते. मात्र, चित्रपटाची निवड होणे ही एक प्रक्रिया असून, आपल्या चित्रपटाचा विचार होईल, अशी आशा राव यांनी बोलताना व्यक्त केली होती. त्यानंतर आज फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ऑस्कर 2025 साठी सहभागी होणाऱ्या चित्रपटांची नावे जाहीर केली आहेत यात राव यांच्या लापता लेडिजला सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी नामांकन मिळाले आहे.

 

29 चित्रपटांना टाकलं मागे

पितृसत्ताक पद्धतीवर हलक्या-फुलक्या पद्धतीने टिप्पणी करणारा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट 29 चित्रपटांच्या यादीतून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. आसामी दिग्दर्शक जाह्नू बरुआ यांच्या अध्यक्षतेखालील 13 सदस्यांच्या निवड समितीने एकमताने आमिर खान आणि किरण राव निर्मित ‘लापता लेडीज’चा अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीत समावेश करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी 29 चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आले आहेत. यामध्ये 12 हिंदी, 6 तमिळ आणि 4 मल्याळम चित्रपटांचा समावेश आहे. 13 सदस्यांच्या टीमने या चित्रपटांची निवड केली आहे.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’चा ‘हा’ सीझन ठरलाय ब्लॉकबस्टर; सदस्यांना मिळणार मोठा धक्का

लापता लेडीज’चे पहिले स्क्रिनिंग गेल्या वर्षी टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाले होते. तेथे या चित्रपटाला प्रचंड प्रशंसा मिळाली. किरण रावचा हा चित्रपट मार्च 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. 5 कोटींपेक्षा कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 25 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube