Ek Dav Bhutacha: सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे खेळणार ‘एक डाव भुताचा’, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Ek Dav Bhutacha Movie : मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपूरे, सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हे अष्टपैलू अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत.

  • Written By: Published:
Ek Dav Bhutacha Marathi Movie

Siddharth Jadhav Makarand Anaspure Ek Dav Bhutacha Movie : मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपूरे (Makarand Anaspure), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हे अष्टपैलू अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत. (Marathi Movie ) ‘दे धक्का’ सारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. आता ‘एक डाव भूताचा’ (Ek Dav Bhutacha) या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपूरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकत्र आले असून, येत्या 4 ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतचं या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर (Social Media) लॉन्च करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)


रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले,अक्षय कुलकर्णी,हर्षद नायबळ अभिनेत्री मयूरी देशमुख,अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते,रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.

Lifeline Marathi Movie: नवसंजीवनीचा संदेश देणारा ‘लाईफलाईन’, कसा आहे सिनेमा?

सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे एकत्र म्हणजे पुरेपूर मनोरंजनाची हमी हे त्यांनी आजवर अनेकदा दाखवून दिलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही त्याचंच प्रतिबिंब दिसतं. एकंदरीत चित्रपटाचे पोस्टर पाहता टॉम अँड जेरीसारखा खेळ या चित्रपटात पाहायला मिळण्याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे मकरंद आणि सिद्धार्थच्या दमदार अभिनयासाठी 4 ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

follow us