मानसी नाईकच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचं पोस्टर रिलीज

Untitled Design   2023 02 03T173532.243

मुंबई : मराठीत सुपरहीट ठरलेल्या अॅटम सॉंग्गने ओळख निर्माण करणारी अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना म्हणजे मानसी नाईक. मानसी आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. मानसीचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्त मानसी फॅन्ससाठी खास गिफ्ट घेऊन आली आहे.

मानसी एका हिंदी वेब फिल्ममध्ये दिसून येणार आहे. फिल्मचं पोस्टर आजच्या खास दिवशी रिलीज करण्यात आलं आहे. पी ए एन्टरटेन्मेंट निर्मीत या फिल्मचं नाव ‘सिफर’ असं आहे. या फिल्ममध्ये मानसी एका महत्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

या भूमिकेबद्दल मानसी सांगते, ‘सिफरचा अर्था शून्य असा आहे, एका अनाथ मुलीचा प्रवास यातून दाखवण्यात आला आहे. याला सिफर का म्हटलं आहे, ते ही फिल्म पाहूनच लक्षात येईल.वाढदिवसाच्या दिवशी या फिल्मची घोषणा करताना मला आनंद होत आहे.’

फिल्मचं शूटिंग लवकरंच सुरू होणार आहे. या भूमिकेचे खूप टप्पे आहेत. मानसीला खूप दिवसांनी अशी भूमिका मिळाली आहे. मानसी या बद्दल म्हणते की, ‘मला ही भूमिका मिळायला बरीच वर्षे वाट पाहायला लागली. गेली अनेक वर्षे डान्सर म्हणून लोकांनी जास्त ओळखलं आहे. पण या भूमिकेमुळे वेगळी मानसी दिसून येईल. ‘

चैतन्य आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मीती असलेली या फिल्मचे दिग्दर्शन विनोद वैद्य यांनी केले आहे. तर धनंजय कुलकर्णी याचे डीओपी आहे. या फिल्ममध्ये हिंदीतील नामवंत कलाकार आहेत, या बद्दल लवकरच खुलासा होणार आहे.

Tags

follow us