मुंबईच्या फिल्मसिटीत प्रसिद्ध दिग्दर्शकाची अडवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर…Video Viral

मुंबईच्या फिल्मसिटीत प्रसिद्ध दिग्दर्शकाची अडवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर…Video Viral

Vasu Patil Post : मुंबईमधील गोरेगाव फिल्मसिटी दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) चित्रनगरीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शकाने सर्व ओळखपत्र दाखवले असताना त्याठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकाकडून त्यांची अडवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.


विशेष म्हणजे अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना फोन लावल्यानंतर देखील  त्यांना पुढे सोडले नाहीत. यावर आता ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय आणि धमाल उडवून देणाऱ्या शोमधील अंकुर वाढवे याने देखील याबद्दल संताप व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. गोरेगावमधील दादासाहेब फाळके येथे अनेक सिनेमाचे तसेच सिरियलचे शूटींग होत असतात.

पोस्टमध्ये नेमकं काय?

“धक्कादायक, काल काही कामानिमित्त मी मुंबईमधील दादासाहेब फाळके चित्रनगरी मध्ये चाललो होतो. नियमानुसार मला सुरक्षारक्षक यांनी मला विचारपूस करण्यासाठी अडवले. मी ही थांबलो, पण मी माझे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे ओळख पत्र दाखवले, तर उत्तर आले असले कार्ड चालत नाही. मी बोललो मी कला दिग्दर्शक आहे मला, ‘जगदंब क्रिएशन’ च्या सेटवर मिटिंगला जायचे आहे, तर बोलले की आम्ही नाही ओळखत. कॉल लावून द्या नाहीतर मेसेज दाखवा. मी निर्मात्यांचा मेसेज दाखवला तर बोलला की असले मेसेज फेक असतात.

मग मी डायरेक्ट डॉ. अमोल कोल्हे यांना संपर्क करून त्यांना बोलायला दिले तर मग पोपटासारखा बोलायला लागला आणि फोन बंद होताच पुन्हा मला नियमाने आत सोडायला येणार नाही, तुम्ही कोणालाही कॉल कराल, मी नाही ओळखत असं म्हणाला. मग मला बोलला ‘जावा पुढे कसे जाता बघतो ‘ त्या बहाद्दराने २ नं गेटवर कॉल करून गाडी अडवायला सांगितली. तिथेही थांबलो. जसे काही अतिरेकी पकडल्यागत सगळे अंगावर आले. मग मी त्यांना तुम्ही सगळ्यांना याच चौकशीतून सोडता का असा सवाल केला. मग त्यांची गडबड झाल. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मला घेऊन गेले. मला अस वाटलं की अरे मी बॉर्डर तर पार नाही केली ना, वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे गेल्यावर पुन्हा प्रोडक्शनला कॉल लावून दिला. मग सगळे सारवासारव करायला लागले, पण मी त्या अधिकाऱ्याला ठणकावून सांगितले की साहेब तुम्हाला बदलीचा पिरेड असतो. पण कला दिग्दर्शकामुळेच या चित्रनगरीला महत्व आहे. आम्ही कायमच येत असतो. तर यावर चांगला तोडगा काढला पाहिजे. सर्वांना एकसारखे नियम,, नाहीतर कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे. यात माझा एक तास वेळ विनाकारण वाया गेला”, असे वासू पाटील यांनी म्हटले आहे.


परंतु या ठिकाणी ‘रावरंभा’, ‘झाला बोभाटा’, ‘हाफ तिकीट’, ‘टुरिंग टॉकीज’ अशा अनेक सुपरहिट सिनेमाचे कला दिग्दर्शन करणाऱ्या वासू पाटील (Vasu Patil ) यांचा अपमानस्पद वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला आहे. वासू पाटील यांनी याबद्दल एक व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

दिग्दर्शक वासू पाटील यांनी या घटनेचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. तसेच याबद्दल पंथय प्रमाणात संताप व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे. अंकुर वाढवेने वासू यांची ही पोस्ट शेअर केली आहे. “हे सगळं भयानक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे, आता यावर कार्यवाही झाली पाहिजे”, असे त्यांनी यावेळी पोस्टमध्ये सांगितले आहे.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube