मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते ‘धर्मवीर-2’ चे पोस्टर लॉन्च, ‘या’ दिवशी रिलीज होणार सिनेमा

मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते ‘धर्मवीर-2’ चे पोस्टर लॉन्च, ‘या’ दिवशी रिलीज होणार सिनेमा

Dharmaveer 2 Poster Lonch : ‘धर्मवीर… मुक्कम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांचा जीवनप्रवास माडंला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. धर्मवीर चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर ‘धर्मवीर 2’ (‘Dharmaveer 2’) चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून आज या सिनेमाचं दुसरं पोस्टरही लॉन्च करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते या चित्रपटाचे पोस्टर लॉंच करण्यात आले.

अहमदनगर सेंट्रल रोटरी क्लबच्या पहिल्या ग्लोबल ग्रँटचा लोकार्पण सोहळा उत्साहात 

‘धर्मवीर 2’ या चित्रपटाच्या पोस्टर लॉंचच्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते बॉबी देओल, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे देखील उपस्थित होते. धर्मवीर – २ या चित्रपटाच्या पोस्टरवर करारी नजर असलेले दिघे साहेब झोपाळ्यावर बसलेले दिसतात. ‘हिंदुत्त्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही’, अशी टॅग लाईनही नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता कमालीची उत्सुकता या पोस्टरमुळे निर्माण झाली आहे.

वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस, BCCI कडून 125 कोटींचे बक्षीस जाहीर 

या चित्रपटासाठी शुभेच्छा देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी धर्मवीर-२ चित्रपटाच्या टीमचं आणि मंगेश देसाई याचं खूप खूप अभिनंदन करतो. आनंद दिघे यांचे कार्य हे एका चित्रपटातून उलगडूनच शकत नाही. त्यामुळे पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकांना प्रश्न पडला की पुढे काय? आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात त्या गोष्टी समोर येणार आहेत. यावेळी सीएम शिंदेंनी प्रसाद ओक यांच्या अभिनयाचं कौतुक केले.

धर्मवीर – २ या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी बाजू प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच सांभाळली आहे. महेश लिमये यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे.

दरम्यान, धर्मवीर -२ हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता धर्मवीर – २ पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करेल यात काहीच शंका नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज