धर्मवीर 2 : आगामी निवडणुकांपूर्वी CM शिंदेंची वातावरण निर्मिती; बंडाची योग्यता पटवून देणार?

धर्मवीर 2 : आगामी निवडणुकांपूर्वी CM शिंदेंची वातावरण निर्मिती; बंडाची योग्यता पटवून देणार?

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ (Dharmaveer) हा मराठी चित्रपट मे 2022 मध्ये चाहत्यांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता ‘धर्मवीर 2’ चित्रपटाच्या (Dharamveer 2) शुटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.  या सिनेमाच्या पहिला भागाला मिळालेल्या यशानंतर निर्माते मंगेश देसाई यांनी काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. आता या सिनेमाच्या प्रत्यक्ष शुटिंगला सुरुवात झाली आहे. (shooting of Dharmaveer 2 has started today and the film is likely to release in May 2024)

दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकीय वातावरण निर्मिती करु शकतात असे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या मे 2024 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. गतवेळी धर्मवीर चित्रपटाचा पहिला भाग मे 2022 मध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बरोबर दीड महिन्यांमध्येच एकनाथ शिंदे यांनी बंड केले होते. त्यावेळी चित्रपट जरी आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असला तरी त्यातून अप्रत्यक्षपणे शिंदे यांचे नेतृत्व राज्यभर पोहचविण्याचा आणि त्यांना राज्यात ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे जाणकारांनी म्हंटले होते.

Rane-Kesarkar : 12 वर्षांत पहिल्यांदाच दोन वैरी एकत्र; तब्बल दीड तास खलबतं, चर्चांना उधाण

आता धर्मवीर 2 सिनेमाच्या पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर ’धर्मवीर 2′ आणि “साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट….” अशी टॅगलाईन आहे. त्यामुळे हा चित्रपट धडाकेबाज पद्धतीने आणि रंजक कथानकाद्वारे आनंद दिघे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येत आहे. त्यानुसार आताही निवडणुकांआधीच धर्मवीरचा दुसरा भाग प्रदर्शित करुन त्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचे बंड कसे योग्य होते, हिंदुत्वाला धरुन होते, एकनात शिंदे कसे आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले जाते.

Maratha Rerervation : शिंदे समितीत काहीतरी गडबड; नाना पेटोलेंचा भुजबळांच्या सुरात सूर

पुन्हा जमणार तरडे-ओक यांची जोडगोळी :

मंगेश देसाई यांच्या साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे “धर्मवीर 2” सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण विट्ठल तरडे निभावणार आहेत. अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर अन्य कलाकरांची नावे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. एकंदरीतच ज्या प्रमाणे “धर्मवीर” सिनेमात कलाकारांची निवड, लेखन-दिग्दर्शन, अभिनय, संगीतासह सर्वच गोष्टी उत्तमप्रकारे जुळून आल्या होत्या. त्याच पद्धतीने आता “धर्मवीर 2″”मध्येही त्याची पुनरावृत्ती होईल, असा अंदाज आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube