Visakha Subedar: विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत; म्हणाली, ‘जाडेपणामुळे…’

  • Written By: Published:
Visakha Subedar: विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत; म्हणाली, ‘जाडेपणामुळे…’

Visakha Subedar: विविध विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखा सुभेदारने ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ (Bullet comedy train ) या कार्यक्रमामधून स्वतःची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. (Social media) ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून त्या प्रत्येकाच्या घराघरात पोहोचल्या आहेत. परंतु तिला अनेकदा स्वत:च्याच जाडपणावर विनोद करत विशाखाने चाहत्यांना हसायला भाग पाडलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)


विनोदी अभिनयासोबतच तिने सिरीयल आणि सिनेमांतून अनेक भूमिका देखील साकारल्या आहेत. परंतु या जाडपणामुळे तिला अनेक चांगल्या भूमिका हातातून गेल्याची खंत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीच्या दरम्यान व्यक्त केली आहे. विशाखाने या मुलाखतीमध्ये अभिनय क्षेत्रातील करिअर, वैयक्तिक आयुष्यासह अनेक गोष्टींची माहिती दिली. या मुलाखतीमध्ये विशाखाने तिच्या जाडपणावर देखील सांगितले आहे.

https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI

लग्न झालंय किंवा बाळ आहे, म्हणून भूमिका नाकारल्या असं कधी झालंय का? असा प्रश्न विचारताच तिने उत्तर देत म्हणाली की, लग्न झालंय किंवा बाळ आहे म्हणून नाही,  परंतु माझ्या जाडेपणामुळे कायम अनेक चांगल्या भूमिका माझ्या हातून गेल्या आहेत. आपली तशी फिगर नाही म्हणून ही भूमिका मिळाली नाही, याची देखील तिला खंत वाटते. तसेच मला सई, अमृता, प्रिया बापट या सगळ्या मुलींचं मला कौतुक वाटतं. कारण त्या ज्या पद्धतीने स्वत:ला मेंन्टेन ठेवत असल्याचे बघायला मिळत. त्यांच्या भूमिकेनुसार त्या वजन वाढवत असतात किंवा बारीक होत असतात. स्वत:च्या शरीरावर कायम काम करत नाही, हे सोपं नाही. हे मला जमत नाही. याची खंत तिला नक्कीच वाटत आहे.

Dono: ‘दोनों’चा ट्रेलर रिलीज होताच राजवीर झाला भावुक; म्हणाला, ‘माझ्यासाठी…’

परंतु माझ्या पद्धतीच्या भूमिका त्यादेखील करू शकणार नाहीत. माझ्या पद्धतीचे रोल मी स्वतः करू शकते, असंही देखील विशाखा यावेळी म्हणाली आहे. तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून विशाखा चाहत्यांचं नेहमी  मनोरंजन करत असते. आज देखील हास्यजत्रेत चाहते तिला मिस करत असतात. विशाखाने अनेक सिनेमात देखील काम केलं आहे. ‘कुर्रर्र’ हा तिचा पहिला नाटकाच्या निमित्ताने तिने या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. सध्या विशाखा स्टार प्रवाहवर ‘शुभविवाह’ सीरियलमध्ये खलनायिकेची भूमिका करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube