फुल ऑन “सुपर डुपर” एण्टरटेन्मेंट…
Super Duper का पाहावा - कसलेल्या अभिनेत्यांची रंगतदार जुगलबंदी, लेखन अन् दिग्दर्शनासाठीका टाळावा - ओल्ड वाइन इन न्यू बॉटल
अमित भंडारी, डिजीटल सीईओ सोहम ग्रुप
मराठी सिनेमात अभिनेते असतात… अस्सल कलाकार असतात… स्टार्स नसतात… हे गृहितक खोडून काढणारा अस्सल अभिनेतेच स्टार्स आहेत, हे ठामपणे मांडणारा हा सिनेमा म्हणजे सुपर डुपर आहे. समीर आशा पाटील या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने केलेला हा सिनेमा धम्माल फॅमिली एन्टरटेनर आहे. Old wine in new bottle हा फॉर्म्युला असला तरीही विनोदी ढंगाने जात असताना कौटुंबिक मूल्य आणि तत्त्व रुजविण्याचा प्रयत्न करताना कुठेही तो overdose होत नाही… मनोरंजनाच्या साखरेच्या पाकात घोळवून ते आपल्यासमोर सादर केलं आहे, हीच त्याची गंमत आहे.
संस्कृतीच्या पदराखाली नाकारलं जाणारं तिचं अस्तित्व; ‘फुला’चा दमदार ट्रेलर लाँच!
प्रत्येक अभिनेत्याने आणि तंत्रज्ञाने तुफान बॅटिंग केली आहे. त्यामुळे हा सिनेमा मनोरंजनाची पर्वणी ठरला आहे. एकच फ्लॅट दोन परस्पर विरुद्ध संस्कारांच्या मुशीत वाढलेल्या जोडप्यांना दिल्यावर काय गोंधळ होऊ शकतो. या एका घटनेमुळे काय काय घडू शकतं त्या परिणामांचे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन काय असू शकतील, एवढ्यावर हा सिनेमा थांबत नाही. त्यामधील रंजक वळणं… त्यामधील माणसांचे रंजक नमुने आणि त्यांच्या मनातील चालणाऱ्या विचारांची आंदोलने आणि त्यामधील हेलकावे खात जीवनाची होणारी फरफट यामध्ये प्रभावीपणे दाखवली आहे.
‘तिघी’चा प्रवास पाचव्या आठवड्यात! प्रेक्षकांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद कायम
यामधील लिखाण कथा, पटकथा आणि संवाद यामुळे सिनेमा एका वेगळ्या उंचीवर जातो… यासाठी समीर आशा पाटीलला स्पेशल ब्राउनी पॉईंट्स द्यायला हवेत… ही गोष्ट कुटुंब… घर आणि नात्यांच्या भिंती इथपर्यंत मर्यादित न राहता जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देताना संस्कार… मूल्य व्यवस्था यावर भाष्य करते. उपदेशाचे डोस न पाजता जगणं समृद्ध करणाऱ्या काही कलकृती आहेत… त्यामध्ये या फिल्मचा समावेश करता येईल… सुपर डुपरचा खरा आत्मा त्याच्या संवादांत आहे. ग्रामीण बोली आणि शहरी भाषेचा सुंदर मिलाफ, त्यातून निर्माण होणारा सहज विनोद आणि प्रसंगानुरूप भावनिक स्पर्श हे सगळं प्रेक्षकांना खिळवून ठेवतं.
“कप गिळताय का आता?” किंवा “झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतातच” यांसारखे संवाद मनात घर करून राहतात.
विनोद हा केवळ हसवण्यासाठी नसून, तो नात्यांमधील ताण हलक्याफुलक्या पद्धतीनं विरघळवतो…ही पटकथेची खासियत म्हणावी लागेल.
“तुझं असणं हीच श्रीमंती…” “तू खमकी तर आम्ही शाबूत …बाई!!! किंवा बाईला स्वयंपाक जमला नाही तर बाई ही नसते का… यामध्ये कुठलाही फेमिनिझमचा झेंडा हातात न घेताही समीर बरंच काही बोलून जातो… स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांबाबत केलेली कमेंट चौकटीला भेदून जाणारी आहे. “बाईने नवऱ्याला कधी मिठीत ठेवायचं आणि कधी मुठीत ठेवायचे, हे शिकलं पाहिजे…” हे पंचेस वर्क होतात.
रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत ‘सालबर्डी’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!
मुळात एकापेक्षा एक अभिनयात कसलेले कलाकार या सिनेमात कास्ट करून दिग्दर्शक आणि अर्धी लढाई जिंकलेली आहे. शशांक शेंडे आणि निर्मिती सावंत यांचे काही काही सीन्स छान जमून आले आहेत. शशांक शिंदे यांनी साकारलेला बाप आजपर्यंत साकारलेल्या बापापेक्षा निश्चित वेगळा आहे. कुटुंबवत्सल असलेल्या शांत स्वभावाच्या या बापाचा राग एकदाच अनावर होतो, त्यावेळी संपूर्ण सिनेमाभर शांत असण्याला एक वेगळे परिमाण मिळतं. शशांक शेंडे हा प्रतिभावंत कलावंत ज्या ताकदीने डोळ्यातून बोलतो दुःख करून आणि सात्विकता वाट्याला फार संवाद नसतानाही चेहऱ्यांच्या हावभावातून सादर करण्यात त्यांनी त्यांचे वेगळेपण अधोरेखित केले आहे.
‘मिमा 2026’ सोहळा दिमाखात संपन्न! ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’
निर्मिती सावंत हे वर्ष गाजवत आहेत… त्या संजू सॅमसन इतक्या सातत्यपूर्ण आहेत….उत्तर मधला त्यांचा दमदार अभिनय… त्यानंतर अगं अगं सुनबाई… आणि आता त्यांनी तर फुल ऑन बॅटिंग केली आहे. निशाणी डावा अंगठा मध्ये असणारी त्यांची बोली… त्यानंतर वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आणि नाटकांमध्ये त्यांनी स्वतःवर केलेले वेगवेगळे प्रयोग निश्चितच त्या किती प्रगल्भ जाणिवांच्या कलाकार आहेत हे ठाशीवपणे जाणवते, पण आता त्यांनी मराठवाडा येथील धाटणीची बोली त्यांनी ज्या पद्धतीने आत्मसात केली आहे आणि त्या खुबीने त्यांनी वापरले आहे… यामध्ये गंमत आहे… त्यांचा वावर सिनेमाला एक वेगळी सहजता देतो… शशांक शेंडे यांच्यासोबत त्यांचे sequences… विदुला सोबतचा ओव्याची सिगरेट पीत पीत त्यांनी कुटुंब व्यवस्थेवर केलेलं भाष्य तितकंच गहिरं आहे पण त्या सीनच्या ट्रीटमेंट मुळे फार गोड सीन झाला आहे. आजपर्यंत केलेले सगळे धंदे बुडीत खात्यात निघाल्यानंतर… अन् नाकर्तेपणाचा असलेला डाग धुवून काढण्याच्या प्रयत्नात असलेला भाऊ साकारताना हृषिकेश जोशी यांनी भावनिक रंग उत्तम पद्धतीने भरले आहेत.
त्याचा आणि शशांक शेंडे यांच्यासोबत एवढे बिझनेस केले तरी पैशात वाटेला अशा वेळेलाही नवा बिझनेस करण्यासाठी तुम्ही पाठीशी का उभे राहता असे विचारणारा सीन आहे तो या दोन्ही कलावंतांनी एका अप्रतिम केला आहे की, तुमच्या डोळ्याच्या कडा ओलावल्याशिवाय राहत नाहीत… नम्रता आवटे संभेराव तिने व्हेंटिलेटर, वाळवी त्यानंतर नाच घुमा… त्यानंतर आता साकारलेली सुनबाई कमाल रंगली आहे तिच्या असण्यात…वागण्यात आणि बोलण्यात गंमत आहे. तिच्या reactions बहारदार आहेत…निर्मिती ताई…प्रतिक्षा आणि फॅमिली सोबत सीक्वेन्सेस फारच रंजक झाले आहेत. कुशल बद्रिके चला हवा येऊ द्या आणि स्ट्रगलर साला या पलिकडे अभिनेता म्हणून त्याने मिळालेल्या संधीचे सोने केलं आहे. मोजके सीन्स आहेत पण तो त्याचे नाणे खणखणीतपणे वाजवतो… प्रतीक्षा कोते हा नवा चेहरा लक्षवेधी आहे… तिच्या काही reactions भन्नाट आहेत… विदुला चौगुलेने boys series मधला जलवा कायम ठेवला आहे. अल्ट्रा मॉडर्न मराठमोळी मुलगी तिने दिमाखदार पद्धतीने सादर केली आहे आणि ललित प्रभाकरने साकारलेला स्ट्रगलर म्युझिशियन … त्याचं वागणं… बोलणं… हे आजच्या मॉडर्न मुलाचे प्रतिनिधित्व करताना ते उपरं वाटत नाही… म्युझिक कंपनी मधला त्याचा उद्रेग…त्याचा किचनमधला नम्रता आणि प्रतीक्षा सोबतच sequence… रिक्षा घेतल्यानंतर बाल्कनीतील त्याचा विदुला सोबतचा सीन… शत्रूचे दुःख समजू शकतो… हे सीन्स त्याने फार समजून उमजून केले आहेत. छोट्या भूमिकेत दिसलेले कांचन पगारे, सुनील देव आणि उमेश जगताप मोजक्या सीन्स मध्ये पण तितकाच प्रभावीपणे रंग भरतात…
मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडिओ प्रदर्शित; सलमान अन् चित्रांगदाची केमिस्ट्री
सिनेमॅटोग्राफर संजय जाधव यांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून कथेला वेगळी उंची देताना… भांडण, राग लोभ रुसवा…भावनिक अंतर आणि जवळीक…हे सगळं दृश्यरूपात प्रभावीपणे टिपलं आहेच पण त्यापलिकडे जाऊन त्यातील warmth जपण्याचा केलेला प्रयत्न हा प्रकाशयोजनेत दिसतो… गाण्यांमध्ये संगीतकारां इतकाच संजय जाधव उठून दिसताना तो ओवर पॉवर करत नाही… हा समतोल तो राखू शकतो… हे त्याचे शक्तिस्थान आहे. हुशारीने केलेला vfx चा वापर visulas मध्ये रंग भरतो… पण कृत्रिम वाटत नाही. अभिजीत देशपांडे सारख्या जाणकार संकलनाच्या हातून संस्कार होण्यासारखी गंमत नाही… त्याचा special touch जाणवतो.
Old wine in new bottle म्हटलं म्हणजे त्या फॉर्मुलाच्या…चौकटीच्या फॉरमॅटध्ये अडकणार… त्या अनुषंगाने जाणवणाऱ्या मर्यादा आणि त्रुटी आहेत… त्या दुर्लक्ष करून चालणार नाहीत, पण त्या पलीकडे जाऊन समीर आशा पाटील याने दिग्दर्शनात दाखवलेलं कसब…त्याच्या लेखनात असलेला कसदारपणा… नात्यांमधला उबदारपणा आणि एकूणच सादरीकरणातील रंजकता यामुळे सिनेमा वेगळ्या उंचीवर जात त्यामुळे त्रुटींपेक्षा जमेची बाजू अधिक झाल्यामुळे सिनेमाचे पारड जड होऊन जातं.. या सिनेमाचे पाठीराखे नरेश बोर्डे, विजय शिंदे आणि झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे विशेष कौतुक करायला पाहिजे. मातीतल्या सिनेमाची पाळमुळं त्यांनी घट्ट धरून ठेवली आहेत…
या सिनेमातील गाणी आणि गाण्यांचे चित्रीकरण ही जमेची बाजू आहे. स्वानंद किरकिरे यांनी गायलेली अंगाई श्रवणीय आहे. नाच दणाणा हे देखील रांगड्या बाजाचे असून त्याचे अरेंजिंग छान जमून आले आहे. क्लायमॅक्स ला वापरलेला रॉकस्टाईल गोंधळ फार इंटरेस्टिंग आहे. शेवट हा फिल्मी का केला आहे असं वाटत असतानाच दिग्दर्शक हा प्रेक्षकाला लागलेला चकवा आहे हे इतकं इमोशनली सांगतो आणि अलवारपणे पापण्यांच्या कडा ओलावून टाकतो… तिथं ही फुल ऑन धमाल मनोरंजनाचे फॅमिली पॅकेज आहे, हे आपल्या लक्षात येतं… सुपर डुपर हा फक्त मनोरंजनापुरता मर्यादित राहत नाही, तर तो मनाच्या आत खोलवर जाऊन स्पर्श करतो. छोट्या-छोट्या प्रसंगांच्या धाग्यांतून तो मोठा आशय विणत नात्यांची खरी किंमत सहजपणे उलगडतो.
तो प्रेक्षकांना मनमुराद हसवतो, कथेत गुंतवून ठेवतो आणि शेवटी मनात एक गोड, उबदार स्पर्श ठेवून जातो… ✨
सुपर डुपर
का पाहावा – कसलेल्या अभिनेत्यांची रंगतदार जुगलबंदी, लेखन अन् दिग्दर्शनासाठी
का टाळावा – ओल्ड वाइन इन न्यू बॉटल
थोडक्यात काय – फुल ऑन “सुपर डुपर” एण्टरटेन्मेंट…
या सिनेमाला मी देतोय चार स्टार्स.
सिनेमा: सुपर डुपर
निर्मिती: नाइन्टी नाइन प्रॉडक्शन्स, झी स्टुडिओज
लेखन-दिग्दर्शन: समीर आशा पाटील
छायांकन: संजय जाधव
संगीत: अभिनव जगताप, कुणाल-करण
संकलन: अभिजीत देशपांडे
कलाकार: ललित प्रभाकर, विदुला चौगुले, निर्मिती सावंत, कुशल बद्रिके, नम्रता संभेराव, हृषिकेश जोशी, शशांक शेंडे, प्रतीक्षा कोते, जागृती दातीर
दर्जा: ⭐⭐⭐⭐ (4/5)