72 Hoorain Movie: 72 हुरें सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात पोलिसात तक्रार; काय आहे नेमकं प्रकरण?
FIR Against 72 Hoorain Director And Producers : ’72 हुरैन’ (72 Hoorain) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सध्या या चित्रपटावर जोरदार टीका होत आहे. २८ जूनला या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. येत्या ७ जुलैला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधामध्ये (Director) मुंबई पोलिसात (Mumbai Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Mumbai, Maharashtra | A man, Saiyad Arifali Mahemmodali files a complaint at Goregaon Police Station against the director and producer of the film, 72 Hoorain for "insulting and disrespecting his religion, promoting communal disharmony, discrimination, hatred and maligning the… pic.twitter.com/QgvfDcBX0u
— ANI (@ANI) July 4, 2023
मुंबईमधील गोरेगाव पोलीस ठाण्यात (Goregaon Police) ’72 हुरैन’च्या निर्मात्यांविरोधात आणि दिग्दर्शकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाची (Muslim community) चुकीची प्रतीमा दाखवल्याचा आरोप त्या दोघांवर लावण्यात आला आहे. समाजसेवक सैय्यद आरिफ अली यांनी तक्रार दाखल केली आहे. ’72 हुरैन’चे दिग्दर्शक संजय पूरन सिंह चौहान आणि निर्माते अशोक पंडित, गुलाब सिंह तंवर, अनिरुद्ध तंवर आणि किरण डागर यांच्यावर धर्माचा अपमान आणि धर्माची चुकीची प्रतीमा दाखवल्याच्या आरोप लावण्यात आला आहे.
तसेच ’72 हुरैन’ हा प्रपोगंडा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे कमावण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी लावला आहे. निष्पाप लोकांना दहशतवादी कसे त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवतात आणि धर्माच्या नावाखाली ते बलिदान द्यायला कसे तयार होत असतात, याची झलक ’72 हुरैन’च्या ट्रेलरमध्ये बघायला मिळाली आहे. या चित्रपटात २ दहशतवाद्यांची गोष्ट दाखवली गेली आहे. अंगावरे शहारे आणणाऱ्या या चित्रपटाची चाहत्यांना देखील मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागली आहे.
72 Hoorain Trailer Out : सेन्सॉर बोर्डाचा विरोध असताना ’72 हुरैन’चा ट्रेलर प्रदर्शित
गेल्या काही दिवसाअगोदर दिल्लीतील जेएनयू विद्यापिठात या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग पार पडलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पूरन सिंह चौहान (Sanjay Puran Singh Chauhan) यांनी ’72 हुरैन’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात पवन मल्होत्रा आणि आमिर बशीर हे मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचा दावा निर्मात्यांनी यावेळी केला आहे. ७ जुलै २०२३ रोजी हा चित्रपट १० भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.