‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’च्या पोस्ट-क्रेडिट सीनमधील गूढ उलगडलं! अभिनेत्याने दिले उत्तर…

Spider-Man Brand New Day चित्रपट जगभर प्रदर्शित झाला. यातील पोस्ट-क्रेडिट सीनमुळे चाहत्यांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Spider Man

Mystery behind post-credits scene of ‘Spider-Man Brand New Day’ has been revealed actor gave answer : सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटचा बहुप्रतीक्षित ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ चित्रपट गेल्या आठवड्यात जगभर प्रदर्शित झाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत अनेक विक्रम नोंदवले असले, तरी सर्वाधिक चर्चा त्याच्या पोस्ट-क्रेडिट सीनची होत आहे. या छोट्याशा दृश्यामुळे चाहत्यांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात काय घडतय; सर्व प्रवक्त्यांची नियुक्ती तात्पुरती रद्द

चित्रपटाच्या शेवटपर्यंत थांबणाऱ्या प्रेक्षकांना पोस्ट-क्रेडिट सीनमध्ये नेड लीड्सने तयार केलेला स्पायडी ट्रॅकर पुन्हा दिसतो. या ट्रॅकरद्वारे टॉम हॉलंडच्या स्पायडर-मॅनचे लाईव्ह लोकेशन दाखवले जाते.सुरुवातीला हा ट्रॅकर पीटर पार्करला क्वीन्समध्ये झुलताना दाखवतो. मात्र, काही क्षणांतच तो दुसऱ्या एका स्पायडर-मॅनचा मागोवा घेतो, जो अवकाशाच्या दिशेने झेप घेत रहस्यमय हिरव्या कक्षेत अदृश्य होताना दिसतो. या दृश्यामुळे भविष्यात आणखी एका स्पायडर-मॅनची टॉम हॉलंडच्या पात्राशी भेट होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. या गूढ स्पायडर-मॅनची ओळख अद्याप निर्मात्यांनी उघड केलेली नसली, तरी अनेक चाहत्यांचा अंदाज आहे की तो अँड्र्यू गारफिल्डचा स्पायडर-मॅन असू शकतो.

मोठी बातमी! पुन्हा तारीख, शिवसेना चिन्ह अन् पक्ष नावाची सुनावणी पुढं ढकलली

मात्र, स्क्रीन रँटला दिलेल्या मुलाखतीत अँड्र्यू गारफिल्ड यांनी हा अंदाज फेटाळला. “मला याबद्दल काहीच माहिती नाही. मी पहिल्यांदाच हे ऐकत आहे. तो मी नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर दुसरा स्पायडर-मॅन टोबी मॅग्वायर असू शकतो का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “कदाचित… तसे असू शकते. कोण जाणे? किंवा तो माइल्स मोरालेसही असू शकतो. मला खरंच माहिती नाही.”

इन्स्टाग्रामवर देव-देवतांच्या नावाने फसवणूक; जादूटोण्याची भीती दाखवून गृहिणीकडून १.३७ लाखांची उकळपट्टी

चित्रपटाच्या शेवटी स्पायडर-मॅन पुन्हा परतणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. अभिनेता टॉम हॉलंड यानेही पुन्हा सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सूचित केले आहे. तसेच दिग्दर्शक डेस्टिन डॅनियल क्रेटन यांनी **’स्पायडर-मॅन 5’**चे दिग्दर्शन करण्याची तयारी असल्याचेही सांगितले आहे.

‘100%’ लिहिलं म्हणजे उत्पादन 100% शुद्ध असतंच असं नाही.. FSSAI चे नियम अन् गाइडलाइंन्स काय?

इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या **’स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’**ने भारतात पहिल्याच विकेंडमध्ये ३०९ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई करत हॉलीवूड चित्रपटांसाठी सर्वाधिक ओपनिंग विकेंड कलेक्शनचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

follow us