Gadar 2: तारा- सकीनाच्या लव्हस्टोरीत नानांची एन्ट्री! साकारणार महत्वाची भूमिका

Gadar 2: तारा- सकीनाच्या लव्हस्टोरीत नानांची एन्ट्री! साकारणार महत्वाची भूमिका

Gadar 2: अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेलचा या दोघांचा गदर-2 (Gadar 2) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहते देखील मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात असल्याचे दिसून येत आहेत. या सिनेमाचा टीझर गेलुआ काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आला. तसेच या सिनेमातील ‘उड जा काले कावा’ हे गाणं देखील ४ दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आले आहे.

आता सिनेमाबाबत एक मोठी अपडेट तरण अदर्श यांनी ट्विटवर दिली आहे. गदर-2 या सिनेमामध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा आवाज चाहत्यांना आता ऐकू येणार असल्याची माहिती तरण आदर्शन यांनी ट्विटरवर ट्विट करून दिली आहे. तरण आदर्शन यांनी याबद्दल माहिती देत असताना सांगितले आहे की, नाना पाटेकर यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘नाना पाटेकर हे ‘गदर 2’ या सिनेमासाठी व्हॉइस ओवर करत आहेत.

नानांचा व्हॉइसओव्हर गदर-2 या सिनेमाच्या अगदी सुरुवातीला चाहत्यांना ऐकू येणार आहे. २००१ मध्ये गदर सिनेमाच्या इंट्रोडक्शनच्या सीनसाठी ओमपुरी यांनी व्हॉईस ओव्हर केला होता. परंतु आता ‘गदर 2’ या सिनेमासाठी नाना पाटेकर यांचा आवाज ऐकण्यासाठी चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाने हिंदी आणि मराठी सिनेमासृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. नाना पाटेकर यांनी त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. नटसम्राट, डॉ प्रकाश बाबा आमटे या मराठी सिनेमामध्ये नाना पाटेकर यांनी अतिशय रंजक असे काम केलं आहे.

Maharashtra Political Crisis: ‘महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठी कलाकारांच्या भन्नाट प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले…

तसेच वेलकम बॅक, तिरंगा, शक्ती, अंगार या हिंदी सिनेमामध्ये नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारत धुमाकूळ घातला आहे. ‘गदर 2’ मध्ये सनी देओल आणि अमिषा पाटेल हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ‘गदर 2’ हा सिनेमा  ‘गदर एक प्रेम कथा’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. या सिनेमात अमिषाने सकिना ही भूमिका साकारली होती, तर सनी देओलने तारा सिंह ही भूमिका साकारली होती. आता तारा सिंह आणि सकिना यांची प्रेमकथा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्याकरिता चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत  आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube