National Cinema Day: या दिवशी कोणताही सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयात

  • Written By: Published:
National Cinema Day: या दिवशी कोणताही सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयात

National Cinema Day 2023: मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने राष्ट्रीय सिनेमा दिन जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षी देखील सिनेमाचा हा फेस्टिव्हल जोरदार साजरा करण्यात आला होता. (National Cinema Day Offer) यामुळे आता यावर्षी देखील हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (Multiplex Association of India) १३ ऑक्टोबर २०२३ या दिवशी ‘राष्ट्रीय सिनेमा दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

हा दिवस सिनेमाप्रेमींसाठी खास पर्वणी ठरणार आहे. त्यांना त्यांच्या आवडीचा सिनेमा फक्त ९९ रुपयात बघता येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील ‘राष्ट्रीय सिनेमा’ दिन म्हणून जाहीर करण्यात आला असल्याची माहिती समोर आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. सिनेमागृहांबाहेर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे बघायला मिळाले होते. तेव्हा फक्त ७५ रुपयांत चाहत्यांना सिनेमाचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले होते.

आता या वर्षी देखील या दिवसाचा आनंद सिनेमाप्रेमींना घेता येणार असल्याचे बघायला मिळणार आहे. सध्या ‘जवान’ आणि ‘गदर २’ या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. प्रेक्षकांकडून या सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही सिनेमानी भरपूर कमाई केली आहे. आता राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त या दोन्ही सिनेमावर मोठी सूट देखील देण्यात येणार आहे. तसेच या वर्षी देखील मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने परत एकदा ही ऑफर देणार असल्याचे सांगितले गेले आहे.

Manapman Muhurta: सुबोध भावेंनी केली नव्या सिनेमाची घोषणा; शूटिंगलाही सुरुवात

१३ ऑक्टोबर २०२३ दिवशी राष्ट्रीय सिनेमा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी देशात सर्व सिनेमागृहात सिनेमाच्या तिकीट फक्त ९९ रुपये राहणार आहे. ‘जवान’ असो की ‘गदर २’ किंवा नुकतेच प्रदर्शित झालेले सिनेमा चाहत्यांना फक्त १०० रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये बघायला मिळणार आहे. चित्रपटांच्या या महोत्सवात ४००० स्क्रीन्सचा समावेश आहे. यामध्ये पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, सिटीप्राइड, एशियन, मुक्ता ए2, मूव्ही टाईम, वेव्ह, एम3के आणि डीलाइटसह अनेक मल्टिप्लेक्स आणि सिनेमागृहाचा समावेश करण्यात आला आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या या ऑफरने २०२२ साली चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. याचा फायदा चित्रपटांनाही झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube