VIDEO : चॅनेलने डच्चू दिला? शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं उत्तर, ही तिसरी वेळ…

VIDEO : चॅनेलने डच्चू दिला? शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं उत्तर, ही तिसरी वेळ…

Nilesh Sabale Answer To Sharad Upadhye Social Media Post : ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yevu Dya) या कार्यक्रमाचं आता दुसरं पर्व येतंय. पहिल्या पर्वाचं डॉ निलेश साबळेंनी सूत्रसंचालन केलं होतं. तर आता दुसऱ्या पर्वात अभिनेता अभिजीत खांडेकर सूत्रसंचालन (Entertainment News) करणार आहे. ही बातमी वाचताच ‘राशीचक्र’कार शरद उपाध्ये (Sharad Upadhye) यांनी निलेश साबळेंसाठी (Nilesh Sabale) फेसबुकवर त्यांनी लांबलचक पोस्ट शेअर केली. हवा येऊ द्याच्या सेटवर त्यांना कशी वागणूक दिली, यासंदर्भात लिहिलं. यावरच आता निलेश साबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निलेश साबळे यांनी काय म्हटलं?

निलेश साबळे यांनी म्हटलंय की, माझ्या वडिलांचा आणि माझा विसंवाद झाला, तर ते सोशल मिडिया वापरत नाही. ते मला थेट झाडतात, तुम्ही वडीलधारी आहात. तुमच्याकडे तो अधिकार आहे. माझी तुमच्याविषयी असणारी भावना खूप मोठी आहे. मी कॉलेजला असल्यापासून तुमचा फॅन आहे. राशीचक्रच्या सगळ्या सीडीज माझ्याकडे आहेत. मी अजूनही ते पाहतो. तुम्ही तुमच्या क्षेत्रात खूप मोठं काम केलाय. मी तुमचा आयुष्यभर फॅन राहील. परंतु ही तुमची पहिली नाही, तिसरी वेळ आहे. सहा वर्षापूर्वी देखील तुम्ही सोशल मीडियावर अशी पोस्ट केली होती.

ड्रग तस्करीत हात असणारे पोलिस होणार बडतर्फ; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

जर हे दहा वर्षापूर्वी घडलं आहे, तर त्या पोस्टमध्ये हे का नाहीये? याअगोदर देखील एका वर्तमानपत्रात तुम्ही असंच काहीतरी मोठं लिहिलं होतं. तरीही आम्ही सोडून दिलं होतं. प्रत्येकाला आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. फक्त काही गोष्टी तपासल्या पाहिजे. फोन करा, विचारा. खरं काय घडलं? सहा वर्षापूर्वीच्या तुमच्या पोस्टमधून मला भंगारवाला, हीन दर्जाचा म्हटलं आहे. तुम्ही काहीही बोलायचं, असा टोला साबळे यांनी उपाध्ये यांना लगावला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nilesh Sabale (@dr.nilesh_sabale_official)

चला हवा येवू द्या, या कार्यक्रमाचं दुसरं पर्व येत आहे. त्याचं सुत्रसंचालन अभिजीत खांडेकर करत आहे. तो माझा चांगला मित्र आहे. अभिजीत माझ्यापेक्षा चांगला कलाकार आहे. तो माझ्यापेक्षा जास्त चांगला अॅंकर आहे. दहा वर्षापूर्वी एखादी घटना घडली. ना मी तुमच्या शेजारी राहतो. ना मी तुम्हाला त्रास देतो. मग हे सारखं सारखं का? तुमचं वय, माझं वय याची तुलना होवू शकत नाही. तुम्ही जी काल पोस्ट केली, तुमचं नाव मोठं असल्या कारणाने मीडियाने ते फिरवलं. त्यानंतर मला पन्नास ते साठ जणांचे फोन आले, त्यात माझे सहा तास वायाला गेले, असं साबळे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात 90 दिवस अन् 767 शेतकऱ्यांची आत्महत्या पण सरकार गप्प; राहुल गांधींचा हल्लाबोल


शरद उपाध्ये यांचे आरोप

आपल्याला ‘हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही. कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुसऱ्याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की, अहंकार अति वाईट. गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते. एखादी पोस्ट मिळाली की, ताठा येतो आणि सर्वनाश होतो. स्टेजवर तुम्ही साऱ्यांना आपलेसे केले नाही. आपले सादरीकरणही आकर्षक
होत नव्हते. या साऱ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले, असं शरद उपाध्ये यांनी निलेश साबळे यांना उद्देशून म्हटलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube