Video : माझ्या बाबाचं नाव मातीत मिळवू नका, अफवा पसरवू नका; नितीन देसाईंच्या मुलीची आर्त विनवणी

Video : माझ्या बाबाचं नाव मातीत मिळवू नका, अफवा पसरवू नका; नितीन देसाईंच्या मुलीची आर्त विनवणी

Mansi Desai On Nitin Desai : प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी 2 ऑगस्ट रोजी एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूमुळे देशभर खळबळ उडाली. काल देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचं बोलल्या जातं आहे. दरम्यान, आज त्यांची मुलगी मानसी देसाई (Mansi Desai) यांनी एएनआयशी संवाद साधला. यावेळी माझ्या वडिलांचा कोणाचीही फसवणूक करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यांच्याबद्दल कोणतीही अफवा पसरवू नये, अशी विनंती त्यांनी केली. ( nitin desai daughter mansi desai says my father had no intention to cheat anyone)

मानसी देसाई म्हणाल्या, ‘आज या प्रेस स्टेटमेंटद्वारे मला सांगायचे आहे की माझ्या वडिलांचा कोणाचीही फसवणूक करण्याचा कोणताही हेतू नव्हता. माझे बाबा आम्हाला सोडून गेल्यानंतर माध्यमांत चुकीचे माहिती पसरवली गेली. ही दु:खद घटना घडल्यानंतर लोन फ्रॉडमॅन म्हणून त्यांच्याविषयी अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या. आम्ही त्यांच्यासोबत जे घडलं, तेच मीडियाला सागंतोय. त्यांच्यावर १८१ करोडचं लोन होतं. त्यापैकी ८६.३१ कोटी रुपये त्यांनी चुकवले होते. त्यासाठी वडिलांनी पवईचं ऑफीस विकून विकलं होतं. ही रक्कम फेब्रुवारी २०२० पर्यंत त्यांनी चुकवलीय.

मानसी यांनी सांगितलं की, उर्वरित रक्कम फेडण्यासाठी त्यांनी सहा महिन्यांचा अवधी मागितला. पण, त्यानंतर कोरोनाची साथ आली. त्यामुळं सर्व जगाला त्याचा फटका बसला. बॉलिवूडलाही बसला. वडिलांना त्या काळात कामं मिळाली नाही. त्यामुळं ते कर्ज चुकवू शकले नाही. परिणीमा एनडी स्टुडिओ बंद झाला. यानंतरही ते कंपनीला भेटले. आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचा कुणालाही फसवण्याचा हेतू नव्हता. त्यांनी गेली दोन वर्ष लोन फेडण्यासाठी प्रयत्न केले. कंपनीनं त्यांनी सांगितलं की, लोन फेडवण्यासाठी ते मदत करतील. कंपनीनं त्यांना आश्वस्त केलं आणि कायदेशीर कारवाई सुरू केली. या प्रकरणात इव्हेस्टरही त्यांना मदत करायला तयार होते. पण, त्यांनी कुणाचीही मदत घेतली नाही. माझी विनंती आहे की, कुणीही चुकीच्या बातम्या पसरवू नका. माझ्या बाबांनी खूप मेहनत करून नाव कमावलं होतं. ते मातीत मिळवू नका. काहीही माहिती प्रकाशित करण्यापूर्वी एकदातरी आम्हाला विचारा. माझ्या वडिलांची इच्छेनुसार, या प्रकरणात महाराष्ट्र सरकारे हस्तक्षेप करून त्यांचा ताब्यात घ्यावा. त्यांना न्याय मिळवून द्यावा, असं मानसी यांनी सांगितलं.

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube