Nitin Desai Death : आत्महत्या करण्यापूर्वी देसाईंनी रेकॉर्ड केल्या ऑडिओ क्लिप, चार बिझनेसमनचा उल्लेख

Nitin Desai Death : आत्महत्या करण्यापूर्वी देसाईंनी रेकॉर्ड केल्या ऑडिओ क्लिप, चार बिझनेसमनचा उल्लेख

Nitin Desai Audio clip : प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्यामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. कर्जत येथील एनडी स्टुडिओत (ND Studio) गळफास घेऊन देसाईंनी जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान, आता या प्रकरणाला नवं वळण आलं आहे. नितीन देसाई यांनी काल रात्री दिल्लीहून आल्यानंतर काही ऑडिओ क्लिप (Audio clip) रेकॉर्ड केल्या होत्या. त्यात सुमारे चार बिझनेसमनचा उल्लेख असल्याचं एबीपी माझाने आपल्या वृत्तात सांगितलं. (Nitin Desai recorded a vice clip before committing suicide)

यांसबंधीच्या वृत्तानुसार, नितीन देसाई काल मध्यरात्री १२ वाजता दिल्लीहून मुंबई विमानतळावर पोहोचले. तेथून कार घेऊन ते अडीच वाजता कर्जत येथील एनडी स्टुडिओत पोहोचले. यानंतर त्यांनी मॅनेजरशी चर्चा केली. त्या मॅनेजरला देसाई म्हणाले की, मी तुला सकाळी व्हॉईस रेकॉर्डर देतो, मग तो व्हॉईस रेकॉर्डर संबंधित व्यक्तीला दे. त्यांच्या सुचनेनुसार मॅनेजर त्यांच्याकडे व्हाईस रेकॉर्डर घेण्यासाठी सकाळी गेला. मॅनेजरने नितीन देसाई यांना एनडी स्टुडिओतील त्यांच्या खोलीत शोधले. पण देसाई तिथे नव्हते. यानंतर तो मॅगा हॉलमध्ये गेला असता तिथं त्याला नितीन देसाई हे गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आले. तिथचं देसाई यांचा व्हॉईस रेकॉर्डर होता. त्या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये काही व्हॉइस नोट्स आहेत. देसाई यांचा मॅनेजर व्हाईस रेकॉर्डर घेऊन पोलिसांकडे गेला आहे. त्या व्हॉईस नोट्समध्ये 4 बिजनेसमनची नावे आहेत. आर्थिक व्यवहारानंतर त्यांनी आपला कसा छळ केला, आपल्यावर कसा दबाव टाकला याचा उल्लेख आहे. त्यामुळे आता हे चार बिजनेसमन तपासाच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar : पालकमंत्रीपदाची वाट न बघता अजितदादा लागले कामाला; ‘पुण्यासाठी’ घेतला मोठा निर्णय 

दरम्यान, पोलिसांनी नितीन देसाई यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. देसाई यांच्या मृत्यूचे अधिकृत कारण अद्याप समोर आले नसले तरी ठराविक मुदतीत पैसे न भरल्यास नितीन देसाई यांच्या स्टुडिओवर जप्तीची कारवाई करण्यात येणार होती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळं देसाई यांना आत्महत्येस कोणी प्रवृत्त केलं याचा शोध घेणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube