नोरा फतेहीची NYC च्या सर्वात मोठ्या दिवाळी पार्टीत एंट्री, धमाकेदार परफॉर्मन्स अन् चाहते घायाळ

  • Written By: Published:
नोरा फतेहीची NYC च्या सर्वात मोठ्या दिवाळी पार्टीत एंट्री, धमाकेदार परफॉर्मन्स अन् चाहते घायाळ

Nora Fatehi : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) कधी आपल्या फोटोसमुळे तर कधी आपल्या डान्स व्हिडिओमुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहते. नुकतंच तिने NYC च्या सर्वात मोठ्या दिवाळी पार्टीमध्ये हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये तिने खास परफॉर्मन्स देखील सादर केला आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतला. नोराने दमदार परफॉर्मन्स करत सर्वांना प्रभावित केले.

‘ऑल दॅट ग्लिटर्स दिवाळी बॉल’ (All That Glitters Diwali Ball) या खास कार्यक्रमात तिने परफॉर्मन्स सादर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आणि तिथे उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली आणि जागतिक लेव्हलवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. या कार्यक्रमात तिने तिच्या जागतिक स्टारडमवर प्रकाश टाकला. नोराने या कार्यक्रमासाठी डिझायनर फाल्गुनी शेन पीकॉकच्या आकर्षक पांढऱ्या पोशाखात कपडे घातले होते.

तर यापूर्वी देखील नोराने आपल्या हाय परफॉर्मन्सने चाहत्यांना घायाळ केले होते. IIFA 2024 च्या मंचावर पायाला दुखापत झाली असताना देखील तिने दमदार परफॉर्मन्स सादर करत सर्वांचे मने जिंकली होती. नोराचे इंस्टाग्रामवर 47 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहे. तर दुसरीकडे नुकतंच तिने पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये पदार्पण करून आणि लुई व्हिटॉन शोमध्ये उपस्थित राहून जागतिक स्तरावर एक लहर निर्माण केली. या अभिनेत्रीने झेंडया आणि ब्लॅकपिंकच्या लिसा सारख्या इतर आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांसोबत हजेरी लावली आणि जागतिक स्थळावर तिची ओळख काय आहे याचा उदहारण दिला होता.

तर ‘लाइट द स्काय’ या फिफा सॉन्गने देखील तिची जागतिक स्थळावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘पेपेटा’, ‘डर्टी लिटल सीक्रेट’ आणि ‘नोरा’ तिचे हे सॉंग्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तर आता ती तिच्या पुढचा सॉन्ग रिलीज करण्याची तयारी करत आहे.

बांगलादेश क्रिकेटमध्ये पुन्हा वाद चक्क हेड कोच निलंबित, जाणून घ्या कारण

माहितीनुसार नवीन गाणं  आंतरराष्ट्रीय स्टार सीके यांच्या सहकार्याने आहे.‘इट्स ट्रू’ टायटल असलेले हे गाणे सीकेच्या ‘इमोशन्स’ अल्बममध्ये दिसणार आहे. तिने जेसन डेरुलोसोबत तिच्या सहकार्याची घोषणाही केली आहे. ती अमेरिकन गायक-नर्तकासोबत व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर 14 नोव्हेंबर 2024 रोजी तिचा आगामी चित्रपट ‘मटका’ रिलीज होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube