OMG 2 Teaser Out: ‘हर हर महादेव’चा जयघोष! ओएमजी-2 चा दमदार टीझर प्रदर्शित

OMG 2 Teaser Out: ‘हर हर महादेव’चा जयघोष! ओएमजी-2 चा दमदार टीझर प्रदर्शित

OMG 2 Teaser Out: अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजेच लाडक्या खिलाडीचा ओएमजी-2 (OMG 2) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामधील खिलाडीचा (Khiladi) लूक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच आता ‘ओएमजी-2’ या सिनेमामधील खिलाडीच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले आहे. आता या सिनेमाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

ओएमजी-2 सिनेमाच्या टीझरच्या सुरुवातीला कांती शरण मुद्गल हे दिसत आहेत. या टीझरमध्ये असे दिसते की कांती शरण मुद्गल हे भगवान शंकराचे चांगलेच भक्त आहेत. ते शंकराची पूजा करत असतात. कांती शरण मुद्गल ही भूमिका अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी साकारलीअसल्याचे दिसून येत  आहे. त्यानंतर टीझरमध्ये खिलाडीची एन्ट्री होते. “रख विश्वास, तू है शिव का दास” हा खिलाडीचा डायलॉग टीझरमध्ये ऐकू येत आहे.

परंतु आता कांती शरण मुद्गल यांच्या आयुष्यात नेमकं काय घडतं? हे ओएमजी-2 या सिनेमात पाहायला मिळणार आहे. खिलाडीने ओएमजी-2 या सिनेमाचा  टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला ‘रख विश्वास, ११ ऑगस्टला ओएमजी-2 थिएटरमध्ये रिलीज होणार असे कॅप्शन दिले आहे.  तसेच ओएमजी-2 हा सिनेमा ११ ऑगस्ट दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात खिलाडी, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

खिलाडीचा ओएमजी (OMG) हा सिनेमा २०१२ मध्ये रिलीज झाला होता. तसेच एका मुलाखतीच्या दरम्यान खिलाडीने सांगितलं आहे की, ओएमजी सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान खिलाडीने नॉन व्हेज खाणं बंद केलं होतं. आता परत ११ वर्षानंतर ओएमजी या सिनेमाचा रिमेक चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ओएमजी-2 या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात आहेत. खिलाडीचा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘सेल्फी’ (Selfiee) हा सिनेमा फ्लॉप ठरला गेला आहे. आता त्याच्या आगामी सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आता ओह माय गॉड 2 या सिनेमाला चाहत्यांची पसंती मिळेल की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube