OMG 2 Teaser: जटा, रुद्राक्षाची माळ, भस्म अन् डमरू; खिलाडीचा ‘ओएमजी २’ लूक आउट 

  • Written By: Published:
OMG 2 Teaser: जटा, रुद्राक्षाची माळ, भस्म अन् डमरू; खिलाडीचा ‘ओएमजी २’ लूक आउट 

OMG 2 Akshay Kumar Look: बॉलिवूडच खिलाडी (Khiladi) म्हणजेच चाहत्यांचा लाडका अक्षय कुमार (Akshay Kumar) ‘ओएमजी २’ (OMG 2 Teaser) या सिनेमाचे एक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यातील खिलाडीचा तो लूक (Look) बघून चाहत्यांनी त्याला अगोदरच इशारा दिला आहे. बॉलिवूडच (Bollywood) खिलाडी अभिनेता अर्थातच अक्षय कुमार याचा ‘ओएमजी २’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)


तसेच या सिनेमात खिलाडी हा जटा, रुद्राक्षाची माळ, भस्म अन् डमरू या अवतारात दिसून आला आहे. या सिनेमाच्या मेकर्सनी नुकतेच या सिनेमाचा टीझर कधी रिलीज होणार याची घोषणा केली आहे. यासोबत त्यांनी खिलाडीचा अभिनित ‘ओएमजी २’ या सिनेमाचे एक मोशन पोस्टर देखील रिलीज केले आहे. परंतु, आता या पोस्टरवरील खिलाडीचा लूक पाहून चाहत्यांनी अगोदरच अभिनेत्याला चांगलीच तंबी द्यायला सुरुवात केली आहे. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये खिलाडीचा अघोरी साधूबाबा आणि शिवभक्ताच्या भूमिकेमध्ये असल्याचे दिसून आला आहे.

यामुळे अगोदरच आता खिलाडीला इशारा देण्यात आला आहे.’ओह माय गॉड’च्या या सिक्वेलचा टीझर ११ जुलैला रिलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घोषणेसोबतच यूजर्सनी मेकर्सना काही सूचना आणि नियमावली द्यायला सुरुवात केली आहे. अभिनेता खिलाडीने एक छोटी क्लिप शेअर करून सिनेमाच्या टीझर रिलीजची डेट जाहीर केली आहे. या व्हिडीओत अभिनेता महादेवाच्या रुपात असल्याचे दिसत आहे. त्याने गळ्यात रुद्राक्षाची जपमाळ घातल्याचे दिसून आला आहे. डोक्यावर लांब जटा धारण केल्या आहेत.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

कपाळावर भस्म फासले आहे, आणि गळ्याला देखील निळा रंग लावल्याचे दिसून आला. तर व्हिडीओमध्ये ‘हर हर महादेव’च्या घोषणा ऐकाला देखील मिळत आहे. खिलाडीचा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. परंतु काही लोकांनी त्याचा हा लूक बघून अगोदरच धोशा कार्याला सुरुवात केली आहे. या सिनेमातून सनातन धर्माचा अपमान होता कामा नये, असे चाहत्यांनी त्याला अगोदरच सुनावलं आहे. सिनेमामध्ये कोणत्याही धर्माची खिल्ली उडवू नये, तसेच हिंदू धर्माच्या देखील भावना कोणत्याही प्रकारे दुखावल्या जाऊ नयेत, असे देखील खिलाडीला चाहत्यांनी सांगितले आहे.

यावेळी एक वेगळीच कथा या सिनेमात बघायला मिळणार आहे. या सिनेमाची कथा लैंगिक शिक्षणाभोवती फिरत असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाला वादांपासून दूर ठेवण्यासाठी सिनेमात कोणाच्याही भावना कोणत्याही प्रकारे दुखावल्या जाणार नाहीत, याची निर्मात्यांनी विशेष काळजी घेतली आहे. अमित राय दिग्दर्शित ‘ओएमजी २’ या सिनेमाची टक्कर सनी देओलच्या ‘गदर २’सोबत असल्याचे बघायला मिळणार आहे. या दोन्ही सिनेमाबद्दल चाहते मोठ्या प्रमाणात वाट पाहत आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube