Onkar Bhojane : ‘त्याने थोडं आधी…; गोस्वामींनी व्यक्त केली खंत

Onkar Bhojane :  ‘त्याने थोडं आधी…; गोस्वामींनी व्यक्त केली खंत

Onkar Bhojane :  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता ओंकार भोजने याचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. काही दिवसांपूर्वीच ओंकारचा ‘सरला एक कोटी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्याआधी तो झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात दिसला होता. त्यावरुन सोशल मीडियावर लोकांनी नाराजी व्यक्त केली होती.

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम गेल्या तीन- चार वर्षांपासून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या मालिकेत ओंकार भोजने याने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्या मालिकेतली ‘अग्गं अग्गं आई’ हा ओंकारचा संवाद हीट ठरला होता.

Sonu Nigam : वैभव आणि ह्रताच्या रोमॅंटीक गाण्याला सोनू निगमचा आवाज

परंतु ओंकारने आपल्या काही कारणास्तव हा कार्यक्रम सोडला होता. यानंतर मालिकेत ओंकार का दिसत नाही, यामुळे चाहते हैरान झाले होते. त्यानंतर अचानक एके दिवशी झी मराठी वाहिनीवरील फू बाई फू या कार्यक्रमात ओंकार भोजने दिसला. त्यावरुन सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच काहींनी तर ओंकार हा पैशासाठी गेला असे देखील लोक बोलले होते.

Devendra Fadanvis : शिंदेंनी सांगितलं की मी लगेच ऐकतो; विधानसभेत फडणवीसांची जोरदार बॅटिंग

या सगळ्या प्रकरणावर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी भाष्य केले होते. ओंकार हा एक उत्कृष्ट आहे. तो जेव्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात आला तेव्हा त्याच्याकडे अनेक गुण होते. त्याला पैलू पाडण्याचे काम या कार्यक्रमात झाले. त्याने शो सोडताना सिनेमा करत आहे, असे कारण देऊन शो सोडला होता. पण नंतर तो दुसऱ्या कार्यक्रमात दिसल्याने चाहते त्याच्यावर नाराज झाले. त्याने पैशासाठी शो सोडला वगैरे ते मला काही माहित नाही, असे गोस्वामी म्हणाले आहेत.

तसेच याआधी देखील त्याने एकदा शो सोडला होता. फक्त त्याने शो सोडताना थोडे आधी सांगायाल पाहिजे होते. कारण ओंकार हा एकटा काम नाही करत तर त्याच्यासोबत आमची पूर्ण टीम काम करत असते, असे गोस्वामी म्हणाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube