अवघा एक महिना शिल्लक! ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’ची भारतात तुफान क्रेझ; अॅडव्हान्स बुकिंगसाठी झुंबड
Avengers Doomsday जगभरानंतर मार्व्हल स्टुडिओने भारतातही ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’चे तिकीट बुकिंग मध्यरात्रीपासून सुरू केले.
Only one month to go Massive craze for ‘Avengers: Doomsday’ in India rush for advance bookings : चाहत्यांच्या मागणीला मार्व्हलकडून प्रतिसाद; मध्यरात्रीपासून बुकिंग सुरू, अनेक शहरांमध्ये शो हाऊसफुल्ल होण्याच्या मार्गावर. अमेरिकेच्या एक दिवस आधी, १७ डिसेंबरला भारतात प्रदर्शित होणार चित्रपट प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे! जगभरात अॅडव्हान्स बुकिंगला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर मार्व्हल स्टुडिओने भारतातही ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’चे तिकीट बुकिंग मध्यरात्रीपासून सुरू केले. बुकिंग सुरू होताच चाहत्यांनी तिकिटे मिळवण्यासाठी मोठी गर्दी केली असून, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी #OpenDoomsdayBookings या हॅशटॅगच्या माध्यमातून अॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर मार्व्हलकडून या मागणीला प्रतिसाद मिळाला आहे.
18 वर्षे, 5 ट्रॉफी अन् आता निवृत्ती.. धोनीच्या IPL ची संपूर्ण कहाणीतील 5 अजय रेकॉर्ड्स…
चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आता अवघा एक महिना शिल्लक असताना देशभरात या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांपासून रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत विविध वेळांमध्ये शो उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुंबई, बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद आणि कोची यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये अनेक शोची तिकिटे वेगाने विकली जात असून काही शो आधीच हाऊसफुल्ल झाले आहेत. अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्याने आपल्या आवडत्या सुपरहिरोंना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी, पहिल्याच शोचे तिकीट मिळवण्याची चाहत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.
Phulwa Khamkar : ’चित्रपताका’तील कार्यशाळेत फुलवा खामकर यांनी नृत्यदिग्दर्शनाचे मर्म उलगडले
‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’ची क्रेझ केवळ भारतापुरती मर्यादित नाही. जगभरात या चित्रपटाच्या अॅडव्हान्स तिकीट विक्रीने तब्बल १५० दशलक्ष डॉलर्सचा टप्पा ओलांडल्याचे वृत्त आहे. प्रीमियम फॉरमॅटमधील तिकीट विक्रीतून पहिल्या २४ तासांतच १६.५ दशलक्ष डॉलर्सची कमाई झाली आहे. त्यातच चित्रपटाच्या पहिल्या पूर्ण लांबीच्या ट्रेलरने प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत ५०३ दशलक्ष व्ह्यूज मिळवले. चित्रपटांच्या ट्रेलर लाँचच्या इतिहासातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विक्रम ठरला आहे.
जिल्हा बँकेत गुलाबराव पाटलांचा दबदबा; सेनेच्या सहा जागा बिनविरोध; भाजपला किती जागा ?
ब्रिटन आणि ब्राझीलसह अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगचे नवे विक्रम केल्याचे सांगितले जात आहे. ट्रेड विश्लेषकांच्या अंदाजानुसार, चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची जागतिक कमाई एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक होऊ शकते. असे झाल्यास जागतिक बॉक्स ऑफिसवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम करण्याच्या शर्यतीत हा चित्रपट असेल.
या जागतिक क्रेझमध्ये भारतानेही आपला वाटा उचलला आहे. अॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्याची मागणी करणाऱ्या चाहत्यांपासून ते आपल्या पसंतीच्या जागा मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांपर्यंत, गेल्या काही आठवड्यांपासून चित्रपटाची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट अमेरिकेतील प्रदर्शनाच्या एक दिवस आधी पाहता येणार आहे.
‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’ हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अमेरिकेतील प्रदर्शनाच्या एक दिवस आधी भारतात प्रदर्शित होणारा हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये पाहता येणार आहे. मार्व्हल स्टुडिओजच्या ‘प्रेझेंटेड इन इन्फिनिटी व्हिजन’सह अन्य प्रीमियम फॉरमॅटमध्येही चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. ‘डूम्सडे’च्या प्रदर्शनाची उलटगणती आता सुरू झाली आहे. चाहत्यांनी मागणी केली, मार्व्हलने ती पूर्ण केली आणि आता तिकिटे संपण्यापूर्वी आपले बुकिंग करण्याची वेळ आली आहे!