Film Festival: नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या वतीने कॅलिफोर्नियात चित्रपट महोत्सवाचे आयोजन

Film Festival: नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या वतीने कॅलिफोर्नियात चित्रपट महोत्सवाचे आयोजन

Film Festival In California: परदेशातील वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट (Marathi films) पोहोचणं ही गोष्ट दिग्दर्शकासाठी खूप महत्त्वाची असते, मात्र आता आणखी एक मोठा अभिमानास्पद क्षण अनेकांना अनुभवायला मिळणार हे तो म्हणजे, थेट मराठी चित्रपट महोत्सवच (Marathi film festival) अमेरिकेत (America) आयोजित करण्यात येणार असल्याचो जोरदार चर्चा सुरु आहे. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या (North American Film Association) वतीने कॅलिफोर्निया येथे ‘चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे आता फक्त मराठी सिनेमाच नाही तर मराठी सिनेमा महोत्सव देखील साता समुद्रापार जाऊन पोहोचला आहे. नॉर्थ अमेरिकेतील मराठी निर्माते अभिजीत घोलप यांनी सुरू केलेल्या NAFA (North American Film Association) या असोसिएशन सोबत पहिल्यांदा या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आहे. या चित्रपट महोत्सवाला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनात अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेते व दिग्दर्शक सचिन पिळगांवकर ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, अभिनेत्री अश्विनी भावे अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर, गीतकार गुरू ठाकूर, अभिनेता सुबोध भावे, अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक, संगीतकार-दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आदी मराठी सेलिब्रिटी मंडळी या चित्रपट महोत्सवास भेट देतील आणि मार्गदर्शन करणार आहेत.

Box Office: राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’च्या कमाईत मोठी घट, कमावले फक्त ‘इतके’ कोटी

या महोत्सवात NAFA (North American Film Association) निर्मित “निर्माल्य’’, ‘’अथांग’’ आणि ‘’पायरव’’ या शॉर्टफिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. या शॉर्टफिल्म अमेरिकेतच चित्रीत करण्यात येणार आहे, तेथील कलाकारांनी बनवलेल्या आहेत.
NAFA चे संस्थापक अभिजीत घोलप यांनी लोकप्रिय चित्रपट ‘देऊळ’ची निर्मिती केली आहे. या सिनेमाला सुवर्णकमळ मिळाले होते, तर अभिनेते गिरीश कुलकर्णी यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे मराठी मनोरंजनसृष्टी अमेरिकेत उभारण्याचा त्यांचा मानस लवकरच पूर्ण होणार अशी अपेक्षा असल्याचे त्यानी यावेळी सांगितले आहे.

सोबतच घोलप हे अमेरिकेतील उद्योजकही आहेत. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या या सिनेमा महोत्सवात 5फिचर फिल्म्सचे प्रिमिअर, दिग्गजांकडून 6 मास्टरक्लास, 3 पॅनल डिस्कशन, 9 शॉर्ट फिल्म्सचे शो असे अनेक कार्यक्रम आयोजित जाणार आहे. 27 आणि 28 जुलैला कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे हे चित्रपट महोत्सव मोठ्या थाटात संपन्न होणार आहे. मराठी सिनेसृष्टी परदेशात प्रगतीपथावर नेण्यासाठी उचलनं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube