Panchayat 3: ‘पंचायत 3’ सीझनमध्ये जितेंद्र कुमारसोबत रोमान्स करणारी ‘ती’ अभिनेत्री कोण? जाणून घ्या..

Panchayat 3: ‘पंचायत 3’ सीझनमध्ये जितेंद्र कुमारसोबत रोमान्स करणारी ‘ती’ अभिनेत्री कोण? जाणून घ्या..

Panchayat 3: ॲमेझॉन प्राइमची सर्वात लोकप्रिय मालिका ‘पंचायत 3’ चा (Panchayat 3) ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहत्यांना ट्रेलर खूप आवडला आहे. या मालिकेत जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) अभिषेक त्रिपाठीच्या भूमिकेत दिसत असून तो फुलेराचा सेक्रेटरी असणार आहे. या मालिकेत अभिषेक रिंकीसोबत गुप्त रोमान्स (Romance) करत असल्याचे दाखवण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)


आता पंचायत 3 च्या ट्रेलरमध्ये असेही दाखवण्यात आले आहे की, रिंकी जेव्हा पाण्याच्या टाकीवर चहा प्यायला जात होती, (Panchayat 3 Trailer) तेव्हा ती अभिषेकला विचारायला येते. मात्र, अभिषेकने दिवस असेल तर कोणीतरी बघेल, संध्याकाळी जाऊ, असे म्हणत नकार दिला.

पंचायत मालिकेत अभिनेत्री सान्विकाने (Sanvikaa) प्रधान जी आणि मंजू देवी यांची मुलगी रिंकीची भूमिका साकारली आहे. या मालिकेत सान्विका जितेंद्र कुमारसोबत रोमान्स करताना दिसत आहे. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. पंचायत 3 च्या ट्रेलरमध्येही दोघांची गुप्त भेट दाखवण्यात आली आहे. पहिल्या सीझनपासूनच आधी मैत्री आणि नंतर काहीसा रोमान्स त्यांच्यात पाहायला मिळाला. आता तिसऱ्या सीझनमध्ये त्यांचा रोमान्स कुठपर्यंत पोहोचतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Ramayan: रणबीरचा ‘रामायण’ हा देशातील सर्वांत महागडा चित्रपट; बजेटचा आकडा पाहून बसेल धक्का

कोण आहे सान्विका?

सान्विका ही मध्य प्रदेशची आहे. सान्विका हिने अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. पण तिला नोकरीत रस नव्हता. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, अभिनेत्रीने सांगितले की, तिने तिच्या आई-वडिलांना बेंगळुरूमध्ये नोकरीसाठी राजी केले होते. पण अभिनयात करिअर करण्यासाठी तिने मुंबई गाठली होती. अभिनेत्रीला तिच्या मुंबईतील मैत्रिणीचा पाठिंबा मिळाला, जो आधीच मनोरंजन क्षेत्रात होती. पंचायत व्यतिरिक्त तिने लखन लीला भार्गव आणि हजमत सारख्या शोमध्ये काम केले आहे. सान्विकाला पंचायतीतूनच नाव आणि प्रसिद्धी मिळाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज