Panchayat 3 Review : ‘पंचायत 3’ मध्ये मनोरंजनाचा डबल डोस, वाचा चित्रपटाचा संपूर्ण रिव्ह्यू

Panchayat 3 Review : ‘पंचायत 3’ मध्ये मनोरंजनाचा डबल डोस, वाचा चित्रपटाचा संपूर्ण रिव्ह्यू

Panchayat 3 Review: गेल्या काही वर्षांपासून अनेकजण ‘पंचायत’ या (Panchayat) सीरिजच्या तिसऱ्या सीझनची (Web Series) मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची हीच प्रतीक्षा आता संपली असून आज (दि.28) या सिरीजचा तिसरा सीझन  रिलीज झाला आहे. या नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना एकाचवेळी आश्चर्य, मनोरंजन, धमाल अशा सर्व काही गोष्टी बघायला मिळणार आहे.

चंदन कुमार लिखित आणि दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी केलेली ही वेब सीरिज भावनांची लाट निर्माण करणारी असून, याचं कथानक अनेकांना रडवणारं, हसवणारं तर काहींना सुन्न करणार आहे. या सिरीजमध्ये जितेंद्र कुमार, (Jitendra Kumar) नीना गुप्ता, रघुबीर यादव यांसारखे मातब्बर स्टारकास्टने काम केले आहे. ग्रामीण भारत आणि नोकरशाहीच्या राजकारणावर या सिरीजमध्ये भाष्य करण्यात आले असून, ‘पंचायत 3’ यंदा (Panchayat 3) थोडीशी राजकीय बनल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन नक्की होणार आहे..

काय आहे नेमकी कथा?

‘पंचायत’च्या या तिसऱ्या सीझनची सुरुवात सचिवजींच्या बदलीने होते आणि प्रेक्षकांना जुन्या ‘फुलेरा’ला’ परतण्यासाठी 5-10 मिनिटे लागत असतात. एकमेकांचे दु:ख हाताळणे, समाजाने एकमेकांना खुल्या हाताने मदत करणे आणि ऐक्याचे महत्त्व या विषयावर ही सीरिज भाष्य करताना दिसत आहे. ट्विस्ट आणि टर्न्सबद्दल सांगायचं झालं तर ही सीरिज प्रेक्षकांना निराश करत नाही. निवडणुकीच्या काळात सुरू असलेल्या राजकीय चर्चेला अनुसरून या सीरिजमध्ये गावातील राजकारण आणि भ्रष्टाचाराचा सखोल वेध घेण्यात आला आहे.

अनुराग सैकिया यांचे संगीत या वेब सीरिजच्या भावनेत चांगलीच भर घालत आहे. त्यातून कथा पाहायला मूड येतो. टायटल ट्रॅक इंस्ट्रुमेंटल ते रॉक असे आहे, तर बॅकग्राऊंड स्कोअर कथानकाच्या भावनिक गोष्टींशी खूप वेगळी आहे. सचिवजी आणि रिंकी एकमेकांच्या शेजारी बसलेले असताना वाजणारी शिट्टी असो किंवा अम्मा प्रल्हादला घर साफ- सफाई करण्यास मदत करत असतात, त्यावेळेस भावनिक ट्रॅक असो, हेच आवाज आणि सूर ‘फुलेरा’चे जीवन खूप वास्तववादी बनवताना दिसले आहे.

स्टारकास्टची धमाल

वेब सीरिजच्या कथेचा विचार केला तर, कथेला पुढे नेण्यासाठी स्टारकास्ट समोर आणण्याचा आणि मुख्य स्टारकास्ट इतकीच स्क्रीन देण्याचा नवा दृष्टिकोन दिग्दर्शकाने यावेळी केला आहे. ही शैली कथेच्या बाजूने नक्कीच कामी आली आहे. आपापल्या स्टाईलमध्ये आणि अनोख्या पद्धतीने दिग्दर्शक प्रत्येकाला हिरो बनवत आहे.

भूषण शर्माच्या मुख्य व्यक्तिरेखेत अभिनेता दुर्गेश कुमार एक मनोरंजक व्यक्तिमत्त्व आहे. यावेळी तो त्यांच्या स्थानाच्या प्रमुख पात्रांना धमकावत असताना दिसत आहे आणि सीझनमधील सर्वात मजबूत भूमिकांपैकी एक म्हणून जोरदार चर्चेत आला आहे. गेल्या सीझनच्या तुलनेमध्ये त्याच्या खऱ्या अभिनय क्षमतेचा योग्य वापर यावेळी करण्यात आला आहे. कोणतीही भूमिका छोटी नसते असे म्हण पंचायत सीझन 3 साठी योग्य ठरत आहे. क्रांती देवीच्या भूमिकेत सुनीता राजवार, आमदार चंद्रकिशोर सिंह यांच्या भूमिकेत पंकज झा, विनोदच्या भूमिकेत अशोक पाठक ते माधवच्या भूमिकेत बुल्लू कुमार यांच्यापासून ते अगदी नाममात्र छोट्या भूमिका साकारणारे स्टार आहेत. अभिनयाची झलक दाखवण्याची आणि चमकण्याची योग्य संधी मिळाली आहे. बाम बहादूर हे अनोखे आणि नवीन पात्र कथेच्या ताकदीत भर घालते. गणेशचे पुनरागमन हा एक आश्चर्याचा धक्का आणि आनंदाचा क्षण असणार आहे. तो प्रेक्षकाला नॉस्टॅल्जिक करतो आणि कथानकात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे.

मुख्य स्टारकास्टचा अभिनय कसा आहे?

मुख्य स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, सर्वजणच नेहमीप्रमाणे विश्वासार्ह आणि धमाकेदार पाहायला मिळाले आहे. ‘अभिषेक त्रिपाठी’च्या मुख्य भूमिकेत जितेंद्र कुमार, ‘ब्रिजभूषण दुबे’च्या भूमिकेत रघुबीर यादव, ‘मंजू देवी’च्या भूमिकेत नीना गुप्ता, ‘विकास’च्या भूमिकेत चंदन रॉय आणि ‘रिंकी’च्या भूमिकेत संविका यान पुन्हा एकदा पडद्यावर कॉमेडी करताना दिसत आहेत. मात्र, या सीझनमध्ये त्यांच्या पात्रांचा प्रवास थोडासा कमी दाखवण्यात आला आहे. अभिनेता जितेंद्र या सीरिजच्या कथेत अतिशय शांत वातावरण आणत आहे, तर संविका कथेत निरागस प्रेमाचा अँगल जोडताना दिसत आहे. तर, चंदन शोचा फन मीटर चालू करताना पाहायला मिळत आहे. नीना यांच्या अभिनय गावाच्या प्रधान पदाची धुरा सांभाळतान आणि राजकारणात नवऱ्याला मागे टाकताना दाखवणारी आहे.

मुलाच्या मृत्यूनंतर प्रल्हाद आयुष्याशी कसा संघर्ष करत आहे, हे जाणून घेण्याची सर्वजण वाट बघत होते. तर, मेकर्सनी देखील या स्टारकास्टच्या पात्राला चांगलाच न्याय दिला आणि त्याच्या कथेवर देखील लक्ष केंद्रित केले आहे. परंतु त्याने आपले आयुष्य कसे सोडले आहे, स्वत:ला व्यसनशील कसे बनवले आहे हे दाखवण्यापासून ते पुन्हा एकदा आपल्या आजूबाजूला जगण्याचे, हसण्याचे आणि लहान-लहान आनंद जोपासण्याचे कारण शोधण्यापर्यंत त्याचे पात्र एक जगण्याची अशा दाखवणारे आहे. गेल्या सीझनमधील प्रल्हादच्या अभिनयाची झलक पाहून सर्वांना खूप भारी वाटतं, आणि फैजल सहज अभिनय कौशल्याने आकर्षक करताना दिसत आहे.

रसिकांच्या भेटीसाठी पुन्हा येणार ‘गेला माधव कुणीकडे’! ‘या’ दिवशी होणार नाटकाचा शुभारंभ

काही ठिकाणी कथा रेंगाळणारी

सिरीजच्या कथेचे लेखन काही ठिकाणी रेंगाळणारी असून, प्रेक्षकांना कंटाळा आणणारी आहे. तर अनेक ठिकाणचे शॉट्स अर्धवट असल्याचे वाटत आहे. यात प्रामुख्याने सरकारविरोधात सुरु असलेल्या संपात सहभागी झालेल्या व्यक्तिरेखेच्या गायब होणे आणि आमदाराच्या लेकीच्या परिचयामागच्या गोष्टी अर्धवट दाखवण्यात आल्या आहेत.

‘पंचायत 3’मध्ये सर्वात जास्त कंटाळवाणं काय असेल तर, ते म्हणजे ही सिरीज मध्येच थोडी ताणून धरताना दिसत आहे. ग्रामीण भाातील अनेक प्रश्न, तळागाळातील राजकारण तसेच भावनिक उलथापालथी एकाचवेळी दाखवण्याचा लेखकाचा प्रयत्न असल्याने काही प्रेक्षकांना ही सिरीज विसंगत असल्याचे वाटत आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर, ‘पंचायत’ या वेब सीरिजचा तिसरा सीझन काही ठिकाणी संथ असला तरी मनोरंजन, भावना आणि थ्रिल फॅक्टर यात अजिबात कमी नसल्याचे पाहायला मिळाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज