Main Atal Hoon: ‘जिगर सोने का…इरादे फौलादी’, पंकज त्रिपाठीच्या ‘मैं अटल हूं’ ची रिलीज डेट जाहीर
Main Atal Hoon Release Date Announced: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीचे अभिनेते आहेत. अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. विविधांगी भूमिकांमधून त्यांनी दमदार अभिनयाची छाप पाडली. सध्या पंकज त्रिपाठी त्यांच्या आगामी ‘मैं अटल हूं’ (Main Atal Hoon Movie) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहेत. या सिनेमात त्रिपाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. (Social Media) अखेर आज या सिनेमाची रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा सिनेमा 19 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
पंकज त्रिपाठी यांच्या सध्या लूकचे तोंडभरून कौतुक होत आहे. चाहते देखील पंकज त्रिपाठी यांची वाहवा करत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करताना पंकज त्रिपाठी यांनी पंडित धीरेंद्र त्रिपाठी यांच्या कवितेच्या काही ओळी देखील लिहिल्या आहे, ‘न कभी कहीं डगमगाया, न कभी कहीं सर झुकाया, मैं एक अनोखा बल हूं, मैं अटल हूं|’ यासोबत त्यांनी सिनेमाच्या रिलीजची तारीख सांगितली आहे. त्यांनी लिहिले की, ‘हे अनोखे व्यक्तिमत्व पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली. मी भावनिक आहे. मी आभारी आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित ‘मैं अटल हूँ’ या बायोपिकमध्ये माजी पंतप्रधानांचे राजकीय जीवन मांडण्यात येणार असून, यासोबतच त्यांच्या एक प्रतिष्ठित कवी, लोकप्रिय जननेता आणि मानवी गुणांनी परिपूर्ण असलेले उत्कृष्ट प्रशासक या बाजू देखील दाखवण्यात येणार आहेत. उत्कर्ष नैथानी लिखित या सिनेमावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांनी काम केले आहे.
‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमातील सोनू निगमच्या आवाजातील ‘मस्तीची सफर…’ गाणे प्रदर्शित
भारतीय राजकारणातील एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल अभिनेते पंकज त्रिपाठी स्वतःला भाग्यवान समजत आहेत. याबद्दल सांगताना पंकज त्रिपाठी म्हणाले की, ‘मोठ्या पडद्यावर अशा राजकारण्याची भूमिका साकारायला मिळणे ही खरचं सन्मानाची गोष्ट आहे. ते केवळ राजकारणी नव्हते, तर त्याहूनही व्यक्ती म्हणून ते खूप काही होते. अटल बिहारी वाजपेयी महान लेखक आणि सुप्रसिद्ध कवी देखील होते. त्यांची भूमिका पडद्यावर साकारताना मला आनंद होतोय.