Parineeti Chopra Wedding: परिणीती अन् राघव चड्ढाच्या शाही विवाह सोहळ्याला सुरुवात; पहिली पोस्ट व्हायरल

  • Written By: Published:
Parineeti Chopra Wedding: परिणीती अन् राघव चड्ढाच्या शाही विवाह सोहळ्याला सुरुवात; पहिली पोस्ट व्हायरल

Parineeti-Raghav Wedding: परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरु झाल्याचे बघायला मिळत आहे. दिल्लीमध्ये परिणीती-राघव यांचा मेहंदी सोहळा पार पडला. आता हे कपल जयपूरला पोहोचले आहेत. जयपूरला एअरपोर्टवरून बाहेर आल्यावर परिणीती आणि राघवचे धमाकेदार वेलकम करण्यात आले आहे. या दोघांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी अनेक सेलेब्रिटी जयपूरला दाखल होत असल्याचे बघायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)


अखेर आज परिणीती आणि राघव याचा हळदी समारोह पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्ताच्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर दिवशी लीला पॅलेस येथे राघव – परिणितीची एकत्र हळद समारंभ पार पडणार आहे. हा सोहळा संगीतमय वातावरणात पार पडणार आहे.

तसेच एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या दोघांचे संगीत देखील आज रात्री होणार आहे. त्यांच्या या हळदीच्या कार्यक्रमासाठी संगीताची थीम ही ९०च्या दशकातील गाणी असणार आहे. राघव-परिणीती यांचा साखरपुडा १३ मे दिवशी पार पडला. त्यानंतर साखरपुड्याचा फोटो पोस्ट करत राघव चड्ढासाठी परिणितीने खास पोस्ट लिहिली असल्याचे बघायला मिळत आहेत. तर राघवने देखील परिणितीसाठी त्याचं प्रेम सोशल मीडियावर व्यक्त केल्याचे बघायला मिळाले आहे.

Parineeti Raghav Wedding : चूडा सेरेमनीपासून फेऱ्यापर्यंत असा असणार राघव-परिणीतीचा विवाहसोहळा

असे असणार कार्यक्रम

२३ सप्टेंबर दिवशी परिणिती चोप्राचा चुडा भरण्याचा कार्यक्रम सकाळी १० वाजता होणार आहे. २३ सप्टेंबरला पाहुण्यांसाठी ९० च्या थीमवर आधारित पार्टी आणि संध्याकाळी ७ वाजता आयोजित कार्यक्रम होणार आहेत. २४ सप्टेंबरला दुपार १ वाजता राघव चड्डा यांना सेहराबंदसाठी जाणार आहे. २४ ला वाजत गाजत वरात घेऊन राघव लग्नाच्या ठिकाणी येणार. २४ सप्टेंबरला दुपार ३.३० वाजता जयमाला होतील आणि त्यानंतर लगेच ४ वाजता दोघे फेरे घेतील. २४ ला संध्याकाळी ६.३० वाजता परिणीतीची पाठवणी करण्यात येणार. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा रात्री ८ वाजता लीला पॅलेस हॉटेलमध्ये त्यांच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन देण्यासाठी हजारी लावणार असल्याचे सांगितले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube