बॉक्स ऑफिसवर ‘PATHAN’ची धमाकेदार कमाई सुरूच, आत्तापर्यंत तब्बल 1009 कोटींची कमाई!

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (81)

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ( Yashraj Films ) पठान ( Pathan ) हा एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या सिनेमाने आजपर्यंत 1009 कोटींची कमाई केली आहे. जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘पठान’ प्रदर्शित झाल्यापासून देशांतर्गत आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. चौथ्या गुरुवारी ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर पुन्हा दमदार कमाई केली.

(Naseeruddin Shah : तर लाल किल्ला, ताजमहाल, कुतूब मिनार पाडून टाका !)

पठाणने आता एकट्या परदेशात 46.24 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे, तर भारतातील नेट कलेक्शन 520.16 कोटी एवढे आहे. पठाण सिनेमाची जगभरातील एकूण कमाई 1009 कोटी आहे. यापैकी भारतात 629 कोटी तर परदेशात 380 कोटी रुपये या सिनेमाने कमावले आहेत.

या सिनेमामध्ये बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खान हा प्रमुख भूमिकेत आहे. तर दीपिका पदुकोन, जॉन अब्राहम हे दोन कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहेत. दरम्यान या सिनेमाच्या सुरुवातीला बराच वाद झाला होता. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकनीवरुन या सिनेमावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर सिनेमात बदल करुन हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता.

 

Tags

follow us