Pathan Review : शाहरूख खान चाहत्यांसाठी खास ट्रीट, कमजोर पटकथेमुळे सादरीकरणात अपयश

Pathan Review : शाहरूख खान चाहत्यांसाठी खास ट्रीट, कमजोर पटकथेमुळे सादरीकरणात अपयश

मुंबई : पठाण हा किंग खान शाहरुखचा कमबॅक सिनेमा असल्याचं म्हटलं जातयं. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता होती. तेव्हा शाहरुखला बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाहरुखला बऱ्याच काळानंतर त्याच्या फिल्मसाठी स्क्रिनवर पाहणं एक ट्रीट आहे.

शाहरुखचा लांब केसांचा हटके लुक लक्ष वेधून घेतोय. त्यानंतर दीपिका पदुकोणचा अॅक्शनपॅक ग्लॅमरस लुक आणि जॉन अब्राहमने साकारलेला खलनायक या सगळ्या गोष्टी पाहणं रंजक वाटतयं. चित्रपटात महत्त्वाचं सरप्राईज आहे. ते म्हणजे सलमान खानचा कॅमियो. तो चित्रपटात कसा आहे ? यासाठी चित्रपट पाहावा लागेल. पण चित्रपटाची पटकथा अर्थहीन वाटते. असं असलं तरी एकामागोमाग येणारे ट्विस्ट मनोरंजन करतात.

भारताबाहेरील विविध सुंदर लोकेशन्स बघायलाही छान वाटतं. चित्रपटाचे व्हिएफएक्स फारच कमकुवत वाटतात. त्यामुळे अनेक ठिकाणी महत्त्वाचे अॅक्शन सीन्स खुलवण्यात अपयश आलयं. चित्रपटाची कहाणी साधी सरळ आहे. भारताचा गुप्तचर पठाण देशाला वाचवण्याच्या मिशनवर आहे. यात भारताचा माजी गुप्तचर जीम हा सुडा खातर देशाविरोधातच कट रचतो.

या सगळ्यात देशभक्ती अधोरेखित करणारी ही कहाणी विविध ट्विस्टसह पुढे जाते. सिद्धार्थ आनंदचं दिग्दर्शन बऱ्यापैकी प्रभावी वाटतय. यशराज फिल्मसचा स्पाय युनिवर्स सिनेमा म्हणून हा सादर होतोय. यात एक्शन आणि सादरीकरणात बऱ्यापैकी हॉलिवूड फिल जाणवतो. छायांकन, संकलन आणि संगीतही कथेला साजेसं वाटतयं. काही त्रुटी वगळता सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा चित्रपट मनोरंजनाची गॅरंटी मात्र देतोय.

रेटिंग – 2.5 स्टार्स
प्रेरणा जंगम, चित्रपट समीक्षक

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube