Shahrukh Khan : ‘पठाण’ 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित

Shahrukh Khan : ‘पठाण’ 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित

मुंबई : बहुचर्चित आणि चाहते ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. तो चित्रपट म्हणजे किंग खान शाहरुखचा पठाण. या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच रेकॉर्ड करायला सुरूवात झाली होती. यामध्ये हा चित्रपट 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित झाली आहे. आता पर्यंत कोणताही भारतीय चित्रपट इतक्या जास्त देशांमध्ये रिलीज झालेला नाही.

हा चित्रपट आज 25 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच रेकॉर्ड करायला सुरूवात झाली . यामध्ये 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित होण्या बरोबरच या चित्रपटाची जगभरातून अ‍ॅडव्हॅान्स बुकींग झाली आहे. पठाणच्या भारताशिवाय जगभरातून होत असलेल्या अ‍ॅडव्हॅान्स बुकींगचा आकडाही कामालीचा मोठा आहे. जगभरात किंग खान शाहरुख खानचे चाहते आहेत. हे चाहते सध्या शाहरुखचा बहुचर्चित चित्रपट ‘पठाण’ अत्यंत वाट पाहत होते.

10 जानेवारीला किंग खान शाहरुखच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. अभिनेता शाहरूख खान, दिपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये मुख्यभूमिकेत आहेत. जेव्हापासून या चित्रपटाचा टिझर आणि पहिले गाणे गाणे रिलीज झाले तेव्हापासून या चित्रपटावरुन बराच गदारोळ सुरू झाला होता.

आज अखेर ‘पठाण’ थिएटरमध्ये रिलीज झाला आहे, अशा परिस्थितीत शाहरुख खानही त्याच्या आगामी अ‍ॅक्शन चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्याच्या तयारीत होता. ‘पठाण’ सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. त्याचा स्क्रीनप्ले श्रीधर राघवन लिहिला आहे.

2022 वर्षात, शाहरुख खानने बॉलिवूडच्या ‘ब्रह्मास्त्र’, ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ आणि ‘लाल सिंह चड्ढा’ मध्ये कॅमिओ भुमिका केल्या होत्या. तर 2023 मध्ये शाहरुख खानचे चाहते त्याला मुख्य भुमिकेत पाहू शकणार आहेत. 2023 मध्ये तो एक नाही तर तीन-तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यामध्ये ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ रिलीज होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube