Phakaat Trailer : भारत-पाक युद्ध, विनोद, प्रेम दाखवणारा ‘फकाट’चा ट्रेलर प्रदर्शित

Phakaat Trailer : भारत-पाक युद्ध, विनोद, प्रेम दाखवणारा ‘फकाट’चा ट्रेलर प्रदर्शित

Phakaat Trailer release : ‘फकाट’ (Phakaat Trailer) या चित्रपटाच्या टीझरमध्ये हेमंत ढोमेची (Hemant Dhome) भूमिका अतिशय रंजक आहे. ( Trailer released) प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके, धमाकेदार आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. आता परत एकदा एक भन्नाट चित्रपट घेऊन ते चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी येत आहेत. ‘फकाट’ या नावाचा चित्रपट धिंगाणा घालायला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या या आगळ्यावेगळ्या नावावरून हा चित्रपट खूपच अफलातून असल्याचे दिसत आहे. तर या ट्रेलरमध्ये भारत-पाक युद्ध, विनोद, प्रेम दाखवण्यात आले आहे. विषय गंभार असतानाही चित्रपटात हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे या जोडीची धमाल दिसत आहे. मात्र या दरम्यान त्यांना कोण-कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते हे पाहायला मिळणार आहे.

या अगोदर आलेल्या टीझरमध्ये आतंकवादी आणि सैनिकांची चकमक, अंगावर शहारे आणणारा गोळीबाराचा मोठा आवाज आणि या दरम्यान एक हायली कॉन्फिडेन्शिअल माहिती असणारी फाईल उघडताना दिसत आहे. या चित्रपटात सैनिकाच्या वेशात नितीश चव्हाण हे दिसून येत आहेत.

Gautami Patil नाचत असतानाच तरुणांकडून…. पोलिसांच्या हस्तक्षेपाने मिटलं

एका बाजूला असे संवेदनशील चित्र दिसत असतानाच दुसऱ्या बाजूला हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे या जिगरी दोस्तांची धमाल देखील दिसत आहे. अचानक या दोघांच्या हातात ती फाईल पडते आणि त्यांच्या डोक्यात एक जबराट कल्पना आल्याची दिसून येत आहे. या स्वप्नांच्या दुनियेमध्ये जगत असतानाच त्यांच्या आयुष्यात पुढे काय घटना घडतात, त्यातून ते दोघे कसा मार्ग काढणार, पुढे मिळालेल्या फाईलचं काय होतं? ती फाईल घेऊन ते दोघे कुठे जाणार? या सगळ्या प्रश्नांचा उलगडा चित्रपटाचा टिझर पाहिल्यावर होणार आहे.

वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित, 19 मे रोजी आपल्या चित्रपटगृहात झळकणाऱ्या या ‘फकाट’च्या निमित्ताने हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे ही जोड पुन्हा एकदा चाहत्यांना भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे. शिवाय या चित्रपटात अविनाश नारकर, नितीश चव्हाण यांच्याही प्रमुख भूमिका साकारले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube