Prakash Raj यांच्या उत्तरामुळे पंतप्रधान मोदींची ‘ती’ पोस्ट डिलीट? Screenshots Viral

Prakash Raj यांच्या उत्तरामुळे पंतप्रधान मोदींची ‘ती’ पोस्ट डिलीट? Screenshots Viral

PM Modi Deleted His Tweet: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज भोपाळ रेल्वे स्टेशनमधून एकावेळेस ५ वंदे भारत ट्रेन्सला (Vande Bharat Train) हिरवा कंदील दाखवला आहे. या कार्यक्रमविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं एक ट्वीट सोशल मीडियावरुन (Social media) डिलीट केल्याचा दावा सध्या करण्यात येत आहे. खरे तर हे कथित ट्वीट डिलीट करण्यापाठीमागे कारण ठरले आहेत, दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या.

प्रकाश राज यांनी सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या एका ट्वीटमध्ये रिप्लाय केलेलं ट्वीट कोणी डिलीट केलं असा सवाल सध्या विचारला जात आहे. सध्या प्रकाश राज यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. सध्या होत असलेल्या दाव्यांनुसार प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका ट्वीटला रिप्लाय देण्यात आला होता. “मी भारताचा एक नागरिक आहे. मी एक सवाल आपल्याला विचारु शकतो का? मात्र माझं ट्वीट कोण डिलीट करु शकतं? केवळ विचारत आहे मी,” अशा कॅप्शनश प्रकाश राज यांनी स्वत:चं ट्वीट आणि डिलीट करण्यात आलेल्या ट्वीटचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

हे स्टेशन मास्तर करु शकतो. तुम्हा आम्हाला मणीपूरमध्ये बघायला आवडेल सरजी,” असा रिप्लाय प्रकाश राज यांनी एका ट्वीटला दिला आहे, ते मूळ ट्वीट डिलीट करण्यात आल्याचे प्रकाश राज यांच्या ट्वीटर टाइमलाइनवर दिसून येत आहे. या ट्वीटमध्ये प्रकाश राज यांनी मणिपूर जळतंय अशा अर्थाचा हॅशटॅग देखील वापरल्याचे दिसून येत आले आहे. हा रिप्लाय प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका ट्वीटला दिला होता. परंतु आता नरेंद्र मोदींचे ते ट्वीट दिसत नाही, हे कोणी डिलीट केलं याबद्दल प्रकाश राज यांनी विचारणा केली आहे.

लोकप्रिय युट्यूबर कुशा कपिलाचा घटस्फोट; लग्नानंतर सहाच वर्षात झाले विभक्त

मोदींच्या ट्वीटमध्ये नक्की काय ?

प्रकाश राज यांनी ट्वीट कोणी डिलीट केलंय असा सवाल स्क्रीनशॉट पोस्ट करुन विचारला आहे. यावर काही जणांनी प्रकाश राज यांनी नेमक्या कोणत्या ट्वीटवर रिप्लाय केला याचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये मूळ ट्वीट मोदींचे होते, यावर प्रकाश राज यांनी चांगलंच सुनावलं आहे. त्या व्हायरल स्क्रीनशॉटनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६ जून दिवशी सायंकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी एक ट्वीट करण्यात आले होते. यामध्ये नरेंद्र मोदींनी, मी उद्या २७ जून दिवशी २ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भोपाळमध्ये राहणार आहे.

पहिला कार्यक्रम ५ वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवण्याच्या कार्यक्रमासाठी राणी कमलापट्टी रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे. या गाड्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, बिहार व झारखंडमधील कनेक्टीव्हीटी वाढवणार आहेत, असं सांगितले होते. या ट्वीटरवरुन नरेंद्र मोदींनी मी ट्रेनला झेंडा दाखवण्यासाठी भोपाळमध्ये असणार आहे, असे सांगितले होते, त्यावर प्रकाश राज यांनी रेल्वेला झेंडा दाखवण्यासाठी स्टेशन मास्तर आहेत. तुम्हाला मणिपूरमध्ये बघायला आवडणार, असा खोचक टोला लगावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube