‘गंदी बात’ वेबसीरीजमध्ये ‘ती’ दृश्ये भोवली; एकता कपूरसह तिच्या आईवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

‘गंदी बात’ वेबसीरीजमध्ये ‘ती’ दृश्ये भोवली;  एकता कपूरसह तिच्या आईवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

POCSO Case Registered Against Ekta Kapoor : ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या सहाव्या सीझनमुळे एकता कपूर (Ekta Kapoor)  गोत्यात सापडली आहे. एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. निर्माता एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अल्ट बालाजी’च्या ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या (Gandi Baat) सीझन 6 च्या एपिसोडमध्ये अल्पवयीन मुलींची अश्लील दृश्ये दाखवल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आलीय.

प्रेक्षकांचं कौटुंबिक मनोरंजन करण्यासाठी Ekta Kapoor अन् महावीर जैन येणार एकत्र!

फेब्रुवारी 2021 ते एप्रिल 2021 दरम्यान ‘अल्ट बालाजी’वर प्रसारित झालेल्या या मालिकेमध्ये अल्पवयीन मुलींची अश्लील दृश्ये दाखवण्यात आली आहेत, असं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय. या वेबसिरीजमध्ये सिगारेटच्या जाहिराती वापरून महापुरुष आणि संतांचा अपमान करण्यात आलाय. त्यामुळे तक्रारदाराच्या भावना दुखावल्या आहेत, असे तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. तसंच या मालिकेच्या एका भागामध्ये POCSO नियमांचे उल्लंघन करणारी काही दृश्ये दाखवण्यात आली आहेत.

Shanaya Kapoor : संजय कपूरच्या मुलीची साऊथ सुपस्टार मोहनलालसोबत धडाकेबाज एन्ट्री! ‘या’ चित्रपटात दिसणार

या सर्व बाबींवरून POCSO सोबतच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, महिला प्रतिबंध कायदा 1986 आणि सिगारेट-इतर तंबाखू उत्पादने कायदा 2003 सारख्या कायद्यांचेही उल्लंघन झाल्याचं दिसतंय. याप्रकरणी मुंबईच्या बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. एका स्थानिक नागरिकाने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याबद्दल मुंबईतील बोरिवली येथील MHB पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती . लहान मुलांवर बनवलेल्या अश्लील चित्रपटांवर न्यायालयाने नुकतीच टिप्पणी केल्यानंतर या दोघींविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सुप्रीम कोर्टाने 27 सप्टेंबर 2024 रोजी सुप्रीम लहान मुलांशी संबंधित अश्लील मजकुराबाबत मोठा निर्णय दिला होता. मुलांसाठी असा अश्लील मजकूर पाहणे, प्रकाशित करणे आणि डाऊनलोड करणे हा गुन्हा असल्याचं कोर्टाने म्हटलंय. या निर्णयामुळे त्यांनी मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळला. या प्रकाराला गुन्हा मानता येणार नाही, असं मद्रास हायकोर्टाने म्हटलं होतं. सध्या हा वादग्रस्त भाग सध्या या ॲपवर स्ट्रीमिंग होत नसल्याची माहिती मिळतेय. एकता कपूर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube