सलमान खानच्या शो मध्ये झळकणार पूनम पांडे
Bigg Boss OTT Show : सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजेच बिग बॉस OTT सीझन 2 हिंदी पूर्वीपेक्षा मोठा, बोल्ड आणि धमाकेदार होणार आहे. विशेष म्हणजे हा शो सलमान खान होस्ट करणार आहे . बिग बॉसच्या चाहत्यांसाठी सीझन 15 काही महिन्यांपूर्वीच संपला आहे आणि आता ओटीटी 2 नुकताच सुरू होणार आहे.
दरम्यान सलमानने बिग बॉस ओटीटी 2 च्या प्रोमोचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि रिपोर्ट्सनुसार तो सोमवारी रिलीज होणार आहे. यावेळी बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये हे सेलेब्स मनोरंजनाचा मसाला लावणार आहेत.
संभावना सेठ : बिग बॉस 2 मध्ये संभावना सेठने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता तिला बिग बॉस OTT सीझन 2 करण्याची संधी मिळाली आहे.
पूजा गौर : ‘मन की आवाज प्रतिज्ञा’मध्ये पूजा छोट्या पडद्यावर सज्जन सिंगची सून आणि कृष्णाच्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसली असेल. आता पूजा बिग बॉस OTT 2 मध्ये दिसणार आहे.
अंजली अरोरा : ‘कच्चा बदाम’ गाण्याने सर्वत्र फेमस झालेली अंजली देखील या शोमध्ये दिसणार आहे. दरम्यान अंजलीने या पूर्वी कंगनाच्या लॉकअपमध्ये देखील भाग घेतला होता.
जिया शंकर : मेरी हानिकरक बीवीमध्ये तुम्ही जियाला पाहिलं असेलच, आता तुम्ही तिला ओटीटीच्या बिग बॉसमध्ये दिसणार आहे.
पूनम पांडे : बिग बॉस OTT 2 मध्ये किती बोल्डनेस पाहायला मिळणार आहे हे आता तुम्हाला समजले असेलच.
राजीव सेन : सुष्मिता सेनचा भाऊ राजीवही बिग बॉस ओटीटीमध्ये दिसणार आहे.
झैद दरबार : नुकताच पिता झालेला गौहर खानचा पती जैद देखील बिग बॉस ओटीटी 2 मध्ये प्रवेश करणार आहे.
मुनावर फारुकी : लॉक अप विजेता मुनावर फारुकीबद्दल बातमी होती की तो खतरों के खिलाडीमध्ये प्रवेश करणार आहे. पण मुनवर आता सलमान खानच्या शोमध्ये दिसणार आहे.
फहमन खान : सुंबुल तौकीर खानचा जवळचा मित्र फहमान खान देखील बिग बॉस OTT 2 चा भाग असणार आहे.
आदित्य नारायण : गायक उदित नारायण यांचा मुलगा आणि इंडियन आयडॉलचा होस्ट आदित्यही काही दिवस बिग बॉसच्या घरात बंद राहणार आहे.
बिग बॉस OTT 2 जूनमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. करण जोहर नाही तर सुपरस्टार सलमान खान बिग बॉसच्या डिजिटल व्हर्जनच्या दुसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.