Adipurush: थिएटरनंतर ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘आदिपुरुष’; कोटींच्या डीलची रंगली चर्चा 

  • Written By: Published:
Letsupp Image (56)

Adipurush OTT: अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) यांचा ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘आदिपुरुष’ या सिनेमाची टीम सिनेमाचे प्रमोशन करत आहे. आदिपुरुष हा सिनेमा 16 जून रोजी रिलीज होणार आहे. थिएटर रिलीजनंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. आदिपुरुष सिनेमाच्या मेकर्सने एका ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत कोट्यवधींची डील केली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)


आदिपुरुष (Adipurush) हा सिनेमा  अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे, असं सांगितले जात आहे. थिएटरमध्ये रिलीज झाल्यावर जवळपास 50 दिवसांनी ‘आदिपुरुष’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. यासाठी ‘आदिपुरुष’ या सिनेमाच्या मेकर्सने 250 कोटी रुपयांची डील केली आहे, असे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘आदिपुरुष’ या सिनेमा रिलीज अगोदरच 432 कोटींचा गल्ला जमवला आहे. थिएट्रिकल राइट्स, सॅटेलाइट राइट्स, म्यूझिक राइट्स, डिजिटल राइट्स अशा अनेक गोष्टींमधून या सिनेमाने रिलीजच्या अगोदर मोठी कमाई केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आदिपुरुष या सिनेमातील जय श्री राम हे गाणं रिलीज झाले आहे. जय श्री राम या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी केलं आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत.

Adipurush ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच मारली बाजी; दोन दिवसांतच केली बक्कळ कमाई!

तसेच या सिनेमातील राम सिया राम हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. जय श्री राम आणि राम सिया राम या आदिपुरुष सिनेमामधील दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आदिपुरुष या सिनेमाला प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारणार आहे. तसेच या सिनेमात सनी सिंह हा लक्ष्मण ही भूमिका साकारत आहे. ओम राऊतनं आदिपुरुष या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

Tags

follow us