Irshalwadi landslide: इर्शाळवाडीसाठी ‘या’ मराठी सेलिब्रिटींचा मदतीचा हात !
Irshalwadi landslide: इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्यासाठी नाट्यसृष्टी पुढे सरसावली असल्याचे पाहायला मिळत आहे. नाटकाच्या प्रयोगाचं उत्पन्न किंवा त्यातील काही भाग त्यांच्या मदतीसाठी दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष आणि अभिनेता प्रशांत दामलेही (Prashant Damle) यात आपला वाटा उचलणार आहे. येत्या ६ जुलै रोजी प्रशांतच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’या नाटकाचा प्रयोग दुपारी ४ वाजता यशवंत नाट्यसंकुलात रंगणार असल्याचे सांगितले आहे.
या प्रयोगाचं जे काही उत्पन्न असेल, त्यातून ५१ हजार रुपये इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांना मदत म्हणून दिले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येईल, असं प्रशांत दामलेनं सांगितलं.यापूर्वी,’व्हॅक्युम क्लिनर’ या नाटकाच्या एका प्रयोगाचं उत्पन्न तर ‘करून गेलो गाव’ या नाटकाच्या तीन प्रयोगांतील उत्पन्नाचा ठरावीक भाग यासाठी देण्यात येणार असल्याचं या दोन्ही नाटकांच्या निर्मात्यांनी जाहीर केलं आहे.
अनेक स्तरातून या दुर्घटनेवर मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. यावर आता अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिने या दुर्घटनेवर एक पोस्ट शेअर (Post Share) केली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी ही वाडी आहे. या ठिकाणी जाण्यासाठी चांगल्या प्रकारचे रस्ते नसल्याने मानवली गावातून पायी चालत जावं लागत असल्याचे यावेळी तिने सांगितले आहे. संपूर्ण वाडीत एकूण ४८ कुटुंबं वास्तव्यास आहेत. तिथली लोकसंख्या २२८ इतकी आहे.
Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…
दरम्यान या दुर्घटनेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचावकार्य होत असल्याचे देखील तिने यावेळी सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील घटनास्थळी लगेचच धाव घेतली आहे. या दुर्घटनेनंतर अभिनेत्री जुईने (Jui Gadkari) अगोदरच्या इर्शाळवाडीला फिरायला गेल्यानंतरचा एक अनुभव सांगितला आहे. इर्शाळवाडी हा आदिवासी पाडा भाग आहे, तसेच तो गाव डोंगराच्या उतारावर आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, दादा भुसे लगेचच दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत. एनडीआरएफची टीम देखील दुर्घटनास्थळी दाखल झाली होती.