प्रियांका चोप्राच्या ‘Citadel’चा फर्स्ट लुक आऊट; वाचा कधी आणि कुठे पाहायला मिळणार ही वेबसीरिज ?

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 02 28T172756.356

Priyanka Chopra Citadel First Look : बॉलिवूड देसी आणि हटके गर्ल प्रियांका चोप्राने (Priyanka Chpra) तिच्या आगामी ‘सिटाडेल’ (Citadel) या वेबसीरिजची पहिली झलक चाहत्यांना शेअर केली. या वेबसीरिजमध्ये देसी गर्ल ही एका गुप्तहेराच्या भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहे. येत्या २८ एप्रिल दिवशी या वेबसीरिजच्या पहिल्या दोन भागांचा प्रीमियर पाहायला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)


‘सिटाडेल’चा फर्स्ट लुक

प्रियांकाने ‘सिटाडेल’चा फर्स्ट लुक हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर केला. देसी गर्लने फर्स्ट लुक शेअर करत तिने लिहिलं आहे की, “सिटाडेल’ ही वेबसीरिज प्राईम व्हिडीओवर पाहता येणार आहे”. ‘सिटाडेल’मधील देसी गर्लचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत लिहिलं आहे की, ‘कमाल’, ‘नेहमीप्रमाणे धमाका करण्यास देसी गर्ल ही सज्ज आहे’, ‘प्रियांकाला नव्या भूमिकेत पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता राहिली आहे.

गुप्तहेराच्या भूमिकेत प्रियांका चोप्रा

‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्ये देसी गर्ल ही एका गुप्तहेराच्या भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहे. नादिया असं तिच्या या पात्राचं नाव आहे. या वेबसीरिजमध्ये प्रियांका एकीकडे अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे तर दुसरीकडे रोमॅंटिक अंदाजात चाहत्यांना घायाळ करताना देखील देसी गर्ल दिसणार आहे. ‘सिटाडेल’च्या फर्स्ट लुकमध्ये प्रियांका खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे.

Pathan : बॉक्स ऑफिसवर ‘पठान’ची विजयी घौडदौड सुरूच, गाठला 1021 कोटींचा पल्ला

‘सिटाडेल’ या सीरिजमध्ये चाहत्यांना सायन्स फिक्शन ड्रामा बघायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये देसी गर्लसह रिचर्ड मॅडन, लेस्ली मॅनविल आणि स्टॅनली टूची प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. रिचर्ड मॅडन केनच्या भूमिकेत आहे. तर स्टॅनली टूची ही देखील एका गुप्तहेराच्या भूमिकेत चाहत्यांना दिसून येणार आहे. सहा भागांच्या या सीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘सिटाडेल’ या वेबसीरिजची निर्मिती २३६ मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली.

देसी गर्लची ‘सिटाडेल’ ही सीरिज २८ एप्रिल दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यानंतर ती ‘लव्ह अगेन’ या रोमॅंटिक, विनोदी सिनेमामध्ये ह्यूगन आणि सेलीन डायोनबरोबरफ झळकणार आहे. तसेच फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या सिनेमामध्ये ती कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसून येणार आहे. प्रियांका सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. खुपवेळा ती लाडकी लेक मालती बरोबर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आणि ‘सिटाडेल’ ही सिरीज जगभरातील २४० देश आणि वेगवेगळ्या प्रदेशांमधील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube