Priyanka Chopra: माझी वागणूक पाहून चिडलेली आईने सांगितला माझ्याबद्दलचा ‘तो’ किस्सा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 02 28T172756.356

Priyanka Chopra: बॉलिवूडची देसी गर्ल (Bollywood Desi Girl ) सध्या सिटाडेलच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त असल्याचे दिसून येतो आहे. (Priyanka Chopra) आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक भूमिका साकारणारी देसी गर्ल तिच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ओळखली जाते. तिने आतापर्यंत एकापेक्षा एक भूमिका केल्या आहेत. पण एकेकाळी ती तिच्या भूमिकेमध्ये इतकी शिरली होती की घरामध्ये देखील ती तशीच वागायची, तिची वर्तणूक पाहून तिला आईने तिला एकदा शिव्या देखील घातले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)


2004 मध्ये देसी गर्लचा ‘ऐतराज’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता, त्यामध्ये तिने सोनिया कपूर नावाची भूमिका साकारली होती. हे एक त्या सिनेमासाठी नकारात्मक पात्र होते, यामध्ये तिने करीना कपूर आणि चाहत्यांचा खिलाडी सोबत काम केले होते. देसी गर्लने एकदा सांगितले होतं की, ती तिच्या घरात देखील सोनिया कपूरसारखी वागू लागली होती, ज्यामुळे तिला आईच्या शिव्या खाव्या लागले होत्या.

तिने एका दिलेल्या मुलाखती दरम्यान देसी गर्लला एक प्रश्न करण्यात आला होता. पात्रात किंवा भूमिकेत शिरणे कठीण आहे की त्यातून बाहेर पडणे? यावर तिने स्पष्ट उत्तर दिले होते की,पात्रात उतरणे कठीण आहे. मी कोणतीही पद्धत ठरवून अभिनय करत नाही. एकदा देसी गर्लशी असे घडलं होतं आणि त्यावेळी तिच्या आईने तिला सरळ म्हणलं होत की तू माझ्या घरी येत असशील तर या पात्रातून बाहेर येत जा.

तसेच देसी गर्ल पुढे म्हणाली, मी सादर केलेल्या सोनियाच्या पात्रासारखी हळूवार चालत असायची, हळूच बोलायचे. सिनेमातील स्टाइलने कॉफी उचलत असायची आणि हळूच वर बघायचे. यावर एक दिवस माझ्या आईने माझा या प्रकाराचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, जेणेकरून मी घरात कशी वागते हे तिला सांगता यावे.

किसी का भाई किसी की जान Review : रेंगाळलेला कंटाळवाणा चित्रपट, सलमानचा स्वॅग आणि अँक्शनने वेधलं लक्ष

एकदा आई म्हणाली, हॅलो घरात कॅमेरा नाही. त्यामुळे घरात असल्यासारखं थोडं तरी वाग. त्यावेळी माझ्यासोबत जे घडलं ते खूप मजेदार होतं. मला वाटलं मी काय करत आहे? पण मी त्यावेळेस खूप लहान होते आणि माझ्या पात्राविषयी मी खूप घाबरत असायचे. यामुळे मी त्या कॅरेक्टरमध्ये नेमही घरी येत असायचे. अशी प्रतिक्रिया देसी गर्लनी दिली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube