‘गौरी’च्या निमित्ताने निर्माती प्राजक्ता माळी दिग्दर्शक आदिनाथ कोठारेंसह पुन्हा सज्ज!

marathi film Gauri या आगामी मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Marathi Film Gauri

producer Prajakta Mali is back in action alongside director Adinath Kothare for marathi film Gauri : ‘पाणी’ या चित्रपटातून दिग्दर्शनाची वेगळी छाप उमटवणारा आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या कामाचा ठसा उमटवणारा आदिनाथ एम. कोठारे आता ‘गौरी’ या आगामी मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी या चित्रपटात ‘गौरी’ची मध्यवर्ती भूमिका साकारणार असून, निर्माती म्हणूनही ती या चित्रपटाची धुरा सांभाळत आहे. एनएच स्टुडिओज आणि शिवोहम क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून, पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, महिलाकेंद्रित विषय मांडणाऱ्या या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

सलमान खानवरील हल्ल्याचा कट फसला, टायगर श्रॉफचा ठावठिकाणा रिक्षाचालकाने सांगितला? हल्लेखोरांनी प्लॅनच बदलला!

पोस्टरमध्ये प्राजक्ता ‘गौरी’च्या भूमिकेत दिसत आहे. ‘गौरी’ हा केवळ एका स्त्रीच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्याभोवती फिरणारा चित्रपट नसून, न्यायासाठी एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या बाजूने उभे राहाण्याची गरज आणि काही प्रसंगी एक स्त्रीच न्याय मिळवून देऊ शकते, हा विचार मांडणारा चित्रपट आहे. आजूबाजूला सर्रास घडणाऱ्या स्त्रियांवरील अन्यायाविषयी हा चित्रपट अतिशय संवेदनशीलपणे भाष्य करणार आहे. चित्रपटाच्या कथानकाविषयी आणि इतर कलाकारांविषयीची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ‘गौरी’च्या माध्यमातून नेमकी कोणती गोष्ट मांडली जाणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

अवघ्या 35 मिनिटांत Jio IPO संपले, पण पैसे लावावे की नाही? जीएमपी, लिस्टिंग गेन आणि तज्ज्ञांची मतं काय?

आशियातील सर्वात मोठा चित्रपट संग्रह असलेला एनएच स्टुडिओज चित्रपट हक्कांचे परवानाकरण, चित्रपट वितरण तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटांची निर्मिती यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. एनएच स्टुडिओज आणि शिवोहम क्रिएशन्स मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत ट्रम्प यांचे मोठे विधान; म्हणाले, हा करार पूर्वीच्या करारांपेक्षा वेगळा…

दिग्दर्शक आदिनाथ एम. कोठारे म्हणतो, “दिग्दर्शक म्हणून चित्रपटाची कथा प्रामाणिकपणे प्रेक्षकांसमोर मांडणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. ‘गौरी’च्या निमित्ताने आम्ही याआधी मराठी चित्रपटसृष्टीत कधीही न हाताळली गेलेली आणि महत्त्वाचा विचार मांडणारी गोष्ट घेऊन येत आहोत. या चित्रपटातून एका मुलीचा संघर्ष, नातेसंबंध आणि न्याय या विषयांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन प्रेक्षकांसमोर येईल. असा विषय दिग्दर्शक म्हणून मांडायला मिळतोय यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो.”

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बार कौन्सिलच्या सदस्यांचा सन्मान

अभिनेत्री आणि निर्माती प्राजक्ता माळी म्हणते, “‘फुलवंती’ हा चित्रपट नवरात्रीत नवमीला प्रदर्शित झाला होता. तसेच, ‘फुलवंती’नंतर निर्माती म्हणून मी घेऊन येत असलेल्या ‘गौरी’ची घोषणाही दशमी अर्थात दसऱ्याला होतेय, हा सुंदर योग आहे. नऊ दिवसांच्या लढाईनंतर दशमीला देवीने महिषासुराचा वध केला होता. त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक स्त्रीने तिच्या अवतीभवती असणाऱ्या प्रत्येक महिषासुराचा वध करावा, हीच भावना या निमित्ताने मनात आहे. एका स्त्रीने ठरवलं तर ती किती धाडसी निर्णय घेऊ शकते, हे यातून आपल्याला पाहायला मिळेल. अभिनेत्री आणि निर्माती अशा दोन्ही भूमिका निभावताना स्त्री सशक्तीकरणासाठी योगदान देण्याचा माझा प्रयत्न आहे.”

नरेंद्र हिरावत, श्रेयांस हिरावत, प्राजक्ता माळी आणि श्वेता माळी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. महिलाकेंद्रित विषय, न्यायासाठीचा स्त्रीचा लढा, एनएच स्टुडिओजसारखी निर्मिती संस्था, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री-निर्माती म्हणून प्राजक्ता माळीची भूमिका यांमुळे ‘गौरी’ हा आगामी मराठी चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

follow us