Pushpa 2 चं पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्लू अर्जुनच्या हुक स्टेपने चाहते घायाळ

Pushpa 2 चं पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्लू अर्जुनच्या हुक स्टेपने चाहते घायाळ

Pushpa 2 Films First Song Pushpa-Pushpa Release : ‘पुष्पा 2: द रुल’च्या ( Pushpa 2 ) या चित्रपटाच्या आणि अभिनेता अल्लू अर्जुनच्या ( Allu Arjun ) चाहत्यांची उत्सुकता अखेर संपली आहे. कारण चित्रपटातील पहिलं वहिलं गाणं ( First Song ) निर्मात्यांकडून रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यातील अल्लू अर्जुनच्या हुक स्टेपने चाहते घायाळ झाले आहेत.

‘योग्यतेच्या माणसांनी प्रश्न विचारला तर उत्तर देईन’ म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवारांचा सडेतोड उत्तर !

देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी ( Rockstar DSP ) यांनी हे गाणं लिहिलं असून संगीतबद्ध केलेले हे गाणे अल्लू अर्जुनच्या पुष्पा राजच्या पात्रासाठी कमालीचं सुंदर आहे यात शंका नाही. ‘पुष्पा: द राईज’चे संगीत जगभर लोकप्रिय झाल्या नंतर आता या गाण्याची मज्जा अनुभवण्यासाठी सगळेच उत्सुक होते अखेर ही उत्सुकता संपली आहे. तर दोन तासांतच या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.

Russia-Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचा हॅरि पॉटर कॅसल आगीच्या भक्ष्यस्थानी; 4 जणांचा मृत्यू

‘पुष्पा पुष्पा’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं सहा भाषांमध्ये रिलीड करण्यात आलं आहे. यामध्ये तमिळ तेलूगू, कन्नड हिंदी मल्याळम आणि बंगाली भाषांचा समावेश आहे. तर वेगवेगळ्या भाषांसाठी हे गाणं नकाश अझीझ, दीपक ब्लू, मिका सिंग, विजय प्रकाश, रणजीत गोविंद आणि तिमिर बिस्वास यांनी या गाण्याला स्वरबद्ध केलं आहे.

15 ऑगस्ट रोजी रिलीज होणाऱ्या ‘पुष्पा 2: द रुल’ ने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे प्रमोशन अद्याप सुरू झाले नसून चित्रपटाने जोरदार व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. एका अहवालानुसार अल्लू अर्जुनचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वीच त्याची कमाई 1 हजार कोटी रुपयांच्या वर पोहोचली आहे. ‘पुष्पा’ एक मोठा ब्रँड बनला आहे. या चित्रपटाच्या इतर भागांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube