चाहत्यांचं प्रेम अन् Rashi Khanna ची स्वप्नपूर्ती; हैदराबादमध्ये घेतलं नवं घर

चाहत्यांचं प्रेम अन्  Rashi Khanna ची स्वप्नपूर्ती;  हैदराबादमध्ये घेतलं नवं घर

Rashi Khanna Buy New House : संपूर्ण भारतातील युवा स्टार राशी खन्ना ( Rashi Khanna ) आणि विक्रांत मॅसी ( Vikrant Messy ) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘द साबरमती रिपोर्ट’ ( The Sabarmati Report )चा ट्रेलर आल्यापासून नेटिझन्स राशीचे स्क्रिप्टच्या निवडीबद्दल कौतुक करत आहेत. याच दरम्यान राशी खन्नाची स्वप्नपूर्ती झाली आहे. कारण राशीने हैदराबादमध्ये नवीन घर विकत घेतले आहे.

भिवंडीमध्ये पवारांकडून बाळ्यामामांना उमेदवारी… साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाणांचा मार्ग मोकळा?

तिच्या घराच्या पूजेचे फोटोज् सोशल मीडिया वर व्हायरल झाले आहेत. तिचे कुटुंब आणि मित्रांसह तिने हे हाऊसवॉर्मिंग केलं. राशीने भारतीय पोशाखात हाऊसवॉर्मिंग करून सोशल मीडिया वर त्याची एक झलक प्रेक्षकांना दिली आहे. तिच्यासोबत तिची आई आणि काही जवळचे नातेवाईक आहेत. जेव्हापासून हे चित्र लीक झाले तेव्हापासून असे यश मिळविल्याबद्दल चाहते राशीचे कौतुक करत आहेत.

अजून वेळ गेली नाही, किता जागा पाहिजे सांगा आणि सोबत या; पटोलेंची ‘वंचित’ला ऑफर

नुकतीच सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर योद्धा मध्ये चमकलेली ही अभिनेत्री ‘द साबरमती रिपोर्ट’ च्या रिलीजसाठी तयारी करत आहे, ज्यामध्ये ती विक्रांत मॅसीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसते. तिच्याकडे तमिळ चित्रपट ‘अरनमानई 4’ आणि तेलुगू चित्रपट ‘तेलुसू काडा’ देखील पाइपलाइनमध्ये आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज