अजून वेळ गेली नाही, किता जागा पाहिजे सांगा आणि सोबत या; पटोलेंची ‘वंचित’ला ऑफर

  • Written By: Last Updated:
अजून वेळ गेली नाही, किता जागा पाहिजे सांगा आणि सोबत या; पटोलेंची ‘वंचित’ला ऑफर

Nana Patole On Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला. अनेक ठिकाणी राजकीय पक्ष आपापले जाहीर केलेले उमेदवार मागे घेऊन नव्या चेहऱ्यांची घोषणा करत आहेत. वंचितने काल रामटेकच्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. हाच धागा पकडून आता कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी (Nana Patole) प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) मोठी ऑफर दिली. अजून वेळ गेली नही, किती जागा पाहिजे ते सांगा, आणि भाजपला पराभूत करण्यासााठी सोबत या, अशी ऑफर पटोलेंनी दिली.

Zareen Khan च्या हस्ते राष्ट्रीय ट्रान्सजेंडर पुरस्कारांचे उद्घाटन; अवॉर्ड्समध्ये झरीनची छाप! 

महाविकास आघाडी आणि वंचित यांच्यातील बैठका निष्फळ झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा वाट धरली. त्यांनी महाराष्ट्रातील काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. मात्र, तरीही महाविकास आघाडीतील नेत्यांना आंबेडकर सोबत येतील, अशी आशा आहे. आता पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांना मोठी ऑफर दिली आहे. ते म्हणाले, प्रकाशजी आणखी रस्ते बंद झाले नाहीत. मी पुढाकार घेतो. तुमच्या भूमीत येऊन सांगतो. नामांकन मागे घेईपर्यंत वेळ आहे. किती जागा पाहिजे ते सांगा. पण भाजपला पराभूत करण्यासाठी सोबत या, अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत वेळ आहे, असं पटोले म्हणाले.

‘आधी माफ केलं पण आता नाही’; वर्षा गायकवाडांची संजय निरुपमांना ताकीद 

पटोले म्हणाले, तुम्ही म्हणता पटोले यांना अधिकार नाहीत. मी स्वतःच्या बळावर सांगतो की, सोबत या. पक्षश्रेष्ठींशी मी बोलेनं. 2014 आणि 2019 ला मतांचं मोठं विभाजन झालं होतं. फुले-शाहू-आबेडकरांच्या महाराष्ट्रात मतांचे विभाजन करण्याचे षडयंत्र भाजपने नेहमीच रचलं, असं आंबेडकर म्हणाले. मी भाजप सोडल्यापासून प्रकाश आंबेडकरांनी माझा राग करण सुरू केलं. मुंबईतील संविधान बचाव रॅलीत आंबेडकरांनी माझा अपमान केला. माझ्यावर खोटे आरोप केले. तरीही माझी आंबेडकरांनी सोबत येण्याची ऑफर असल्याचं पटोले म्हणाले

बाबासाहेबांनी एका मिनिटात राजीनामा दिला होता. मी पण दिला. मी खासदार असताना मोदींना विरोध केला होता. मग बाबासाहेबांचे खरे अनुयायी कोण? असा सवालही नाना पटोले यांनी केला.

मॅच फिक्सिंग नाना पटोलेंच्या रक्तात नाही. अकोल्यात अभय पाटल उमेदवारी मागे घेणार असल्याची चर्चा रंगली होती. पण मी सांगतो, असं होणार नाही, असं पटोले म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज