Armanai 4 च्या शूटमध्ये घडली खास गोष्ट! राशी खन्नाने व्यक्त केली कृतज्ञता
Rashi Khanna on Aranmanai 4 :‘अरनमानाई 4’ ( Aranmanai 4) या चित्रपटाने तमिळ चित्रपट उद्योगात एक नवा रेकॉर्ड रचला आहे आणि 2024 चा पहिला हिट चित्रपट म्हणून उदयास आला. याने प्रेक्षक तसेच समीक्षकांकडून खूप तोंडभरून कौतुक मिळवलं आणि बॉक्स ऑफिसवर (Box Office) पहिल्या वीकेंडमध्ये 20 कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटातील अभिनेत्री! राशी खन्नाने ( Rashi Khanna ) चित्रपटातील शूटमध्ये घडलेली खास गोष्ट सांगितली. तसेच तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
Ankush Chaudhari अन् निर्माते अभिषेक बोहरा पहिल्यांदाच येणार एकत्र
‘अरनमानाई 4’ रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना हॉरर-कॉमेडीबद्दल वेड लागलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. किंबहुना हा या वर्षातील पहिला तमिळ हिट चित्रपट देखील ठरला आहे आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. चित्रपटाला होकार देण्यामागचे कारण सांगताना राशी म्हणाली,
भाजप खासदार ब्रिजभूषण सिंहांना धक्का! लैंगिक शोषण प्रकरणी आरोप निश्चितीचे कोर्टाचे आदेश
“मी ‘अरनमानाई 3’ मध्ये काम केले आहे.त्यामुळे मी स्क्रिप्ट किंवा कथनाशिवाय ‘अरनमानाई 4’ साइन केले. आमचा दिग्दर्शक सुंदर सी यांच्यावर माझा विश्वास होता. तो हॉरर-कॉमेडी शैलीचा मास्टर आहे आणि त्या विश्वासाने मी फिल्म केली. जेव्हा एखादा चित्रपट निर्मात्याला काय हवे आहे याबद्दल इतके स्पष्ट असते तेव्हा कलाकारांसाठी ते खूप सोपे होते. या चित्रपटाच्या सेटवर काम करणं सगळ्यात सोप्प होत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे याचा मला आनंद आहे”
‘अरनमानाई ४’ मध्ये राशि खन्ना डॉ. मायाची भूमिका साकारत आहे. राशी वर सतत कौतुकाचा वर्षाव होत असताना ती आगामी प्रोजेक्ट्सची तयारी करत आहे. ती विक्रांत मॅसीसोबत ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये काम करणार आहे. हा चित्रपट २ ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याशिवाय ती हिंदी चित्रपट ‘TME’ आणि तेलुगू चित्रपट ‘तेलुसू कडा’ मध्येही दिसणार आहे.