अभिनेत्री जास्मीन भसीन गेल्या महिन्यापासून आजारी, आरोग्याविषयी केला ‘हा’ मोठा खुलासा

डॉक्टरांनी तिला एका गंभीर आजाराची शंका व्यक्त केली असून त्यावरील उपचार सुरू आहेत अशी माहिती तिने दिली आहे.

News Photo   2026 07 27T170850.214

अभिनेत्री जास्मीन भसीन आरोग्याशी (Actress) संबंधित विविध समस्यांचा सामना करत आहे. गेल्या महिन्यात ती तिच्या वाढदिवशीच दुबईतल्या रुग्णालयात दाखल होती. जास्मीनचा रुग्णालयातील एक फोटो तिचा बॉयफ्रेंड अली गोणीने सोशल मीडियावर शेअर केला होता. यादरम्यान आता जास्मीनने तिच्या आरोग्याविषयी मोठा खुलासा केला आहे.

डॉक्टरांनी तिला एका गंभीर आजाराची शंका व्यक्त केली असून त्यावरील उपचार सुरू आहेत. वाढदिवस साजरा करण्यासाठी जास्मीन दुबईला गेली होती. मात्र दुबईत पोहोचताच तिची प्रकृती बिघडली. दुसऱ्याच दिवशी तिला कणकण जाणवू लागली होती. थकव्यामुळे कणकण जाणवत असेल, असं वाटून जास्मीनने गोळी घेतली. पण तीन दिवसांपर्यंत तिचा ताप उतरला नव्हता.

अन्यायाविरुद्ध उभा ठाकणार ‘रंगा’! ‘सायको रंगा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित ..!!!

दुबईत गेल्यानंतर मला अस्वस्थ वाटू लागलं होतं. दुसऱ्याच दिवशी मला ताप आला होता. हे सर्व थकव्यामुळं होतंय, असं मला वाटत होतं. म्हणून मी पॅरासिटामॉल ड्रिप आणि आयव्ही फ्लुएड्स घेतले. पण तीन दिवसांपर्यंत माझा ताप उतरला नव्हता आणि माझी प्रकृती आणखीनच बिघडली. मग मी अली आणि माझ्या मित्रांना रुग्णालयात घेऊन जायला सांगितलं. माझ्या शरीरातील संसर्ग आणि दाह यांचं प्रमाण तपासण्यासाठी डॉक्टरांनी सीआरपी चाचणी केली.

ज्याची सामान्य पातळी 0 ते 5 असतं. पण माझ्यात ती पातळी 323 होती, जी खूप चिंताजनक होती. डॉक्टरांनी मला सांगितलं की माझ्या आतड्याच्या एका बाजूला सूज आली होती. त्यामुळे मला गंभीर आजाराचा संशय आला. त्यामुळे पुढील उपचारांसाठी मी भारतात परतले आहे. देवाच्या कृपेने मी आता बरी आहे. पण गेल्या दीड महिन्यापासून मी सतत आजारी पडत होते. आता तर मी बरी आहे असं म्हणायलही मला भीती वाटते असंही ती म्हणाली आहे.

Tags

follow us