Rhea Chakraborty : “तुम्हाला काय वाटलं मी येणार नाही”; सुशांतच्या निधनाच्या 3 वर्षांनंतर रियाचा कमबॅक

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 10T160823.190

Rhea Chakraborty: अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) बराच काळ मनोरंजनक्षेत्रापासून दूर होती. रिया लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. रिया एमटीव्ही शो ‘रोडीज’ (Roadies Season 19) च्या 19 व्या सीझनमध्ये गँग लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो देखील रिलीज झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MTV Roadies (@mtvroadies)


अभिनेता सुशांत सिंह राजपूत एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘रोडीज 19’ चा प्रोमो शेअर केला आहे. ‘रोडीज कर्म या कांड’ च्या प्रोमोमध्ये रिया चक्रवर्ती ही ऑल ब्लॅक लूकमध्ये चाहत्यांना दिसणार आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते, “तुम्हाला काय वाटलं होतं की, मी परत येणार नाही, मला भीती वाटेल… घाबरण्याची वेळ दुसऱ्याची आहे.

ऑडिशनला भेटूया, या कार्यक्रमामध्ये प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटी यांच्याबरोबर रिया ‘गँग लीडर’च्या भूमिकेत चाहत्यांना दिसून येणार आहे. रिया चक्रवर्तीने एका दिलेल्या मुलाखतीमध्ये रोडीज या कार्यक्रमाविषयी सांगितले आहे की, मी ‘रोडीज – कर्म या कांड’ या कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग होण्यासाठी खूप उत्साहित आहे. सोनू सूद आणि गँग लिडर्सबरोबर काम करून या रोमांचक प्रवासामध्ये मी माझी निर्भय बाजू चाहत्यांना दाखवणार आहे. मला आशा आहे की, या कार्यक्रमाने मला चाहत्यांचा पाठिंबा आणि प्रेम मिळणार आहे. यावेळी सोनू सूदही शोमध्ये दिसणार आहे.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

रिया चक्रवर्तीचे चित्रपट

रियाने २०१२ मध्ये आलेल्या ‘तुनिगा तुनिगा’ या तेलगू चित्रपटाने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटाच्या अवघ्या १ वर्षानंतर म्हणजेच २०१३ मध्ये ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. रियाने गेल्या अनेक वर्षात चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Ghungaru Teaser: सबसे कातील गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित

‘सोनाली केबल’, ‘दोबारा’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘बँक चोर’, ‘चेहरे’ आणि ‘जलेबी’ या सिनेमात काम केले आहे. २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रियावर काही आरोप करण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी या आरोपावरून रियाला ट्रोल केले होते. रिया ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असल्याचे सांगितले आहे. तिच्या आता रोडीज या नव्या कार्यक्रमाची आणि सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Tags

follow us