‘RRR’ ने पुन्हा उंचावली देशाची मान, चित्रपटातील गाणं ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट

‘RRR’ ने पुन्हा उंचावली देशाची मान, चित्रपटातील गाणं ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट

मुंबई : ‘आरआरआर’ च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसएस राजामौलींचा आरआरआर’ ऑस्कर 2023 साठी शॉर्टलिस्ट झाला आहे. चित्रपटातील गाणं ‘नातु नातु ला बेस्ट सॉन्ग कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. हे गाणं आता ऑस्कर 2023 साठी निवडलेल्या एकूण 15 गाण्यांमध्ये आता ते समाविष्ट झाले आहे.

‘नातु नातु’ शिवाय या लिस्टमध्ये अवतार: द वे ऑफ वॉटर, ब्लॅक पॅंथर मधील ‘लिफ्ट मी अप’: वकंडा फॉरएवर आणि टॉप गन: मेवरिक मधील ‘होल्ड माई हॅंड’ गाणे सामिल आहेत. तर ‘आरआरआर’ अल्लुरी सीताराम राजू (राम चरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित आहे.राम चरण आणि जूनियर एनटीआर शिवाय, चित्रपट आलिया भट्ट, अजय देवगन, श्रिया सरन, रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिस यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दुसरीकडे सध्या जेम्स कॅमरून च्या ‘अवतार द वे ऑफ वाटर’ इंडियन बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. पहिल्या वीकेंडच्या तुलनेत या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईमध्ये घट झाली मात्र ‘अवतार 2’ ची कमाई दमदार झाली आहे.

ऋषभ शेट्टीचा कन्नड ब्लॉकबस्टर कांताराच्या ‘निश्चितपणे’ फ्रेंचायझी येतील, चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी ही माहिती दिली. ऋषभ शेट्टी लिखित आणि दिग्दर्शित, कंतारा 30 सप्टेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हा त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. कांताराला मिळालेल्या प्रतिसादाने निर्माते उत्साहित आहे आणि लवकरच या चित्रपटाचा ‘एकतर प्रीक्वल किंवा सिक्वेल’ येईल, असे होंबळे फिल्म्सचे संस्थापक विजय किरगांडूर यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube