आरआरआरची क्रिटिक्स चॉईसमध्येही बाजी, चित्रपटाला आणखी दोन अॅवॉर्ड्स
मुंबई : गोल्डन ग्लोब्स अॅवॉर्ड 2023 मध्ये जिंकल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ ने देशाची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. आरआरआर या चित्रपटाला आता क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्येही बेस्ट फॉरेन लॅंग्वेज त्याचबरोबर चित्रपटातील ‘नाचो नाचो’ या गाण्याला देखील बेस्ट ओरिजनल सॉन्ग हे अॅवॉर्ड मिळाले आहे.
28 व्या क्रिटिक्स चॉइस अॅवॉर्ड्सच्या ट्विटर हॅंडलवरून या संदर्भात माहिती देण्यात आली. या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘@RRRMovie च्या कास्ट आणि क्रूला शुभेच्छा – चित्रपटाने बेस्ट फॉरेन लॅंग्वेज #criticschoice अॅवॉर्ड जिंकला. #CriticsChoiceAwards’ज्युनियर एनटीआर आणि राम चरण स्टारर चित्रपटाला ‘नाचो नाचो’ गाण्याने बेस्ट ओरिजनल सॉन्ग का क्रिटिक्स चॉइस अॅवॉर्ड्स देखील मिळाला.
त्यानंतर क्रिटिक्स चॉइस अॅवॉर्ड्सच्या ऑफिशियल ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये एसएस राजामौली या सोहळ्यात अत्यंत आनंदात दिसून आले. यामध्ये राजामौली ट्रॉफीसोबत शटरबग्ससाठी पोज देताना दिसले. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हॅंडल चीयर्स ऑन अ वेल डिजर्व्ड विन @RRRMovie.’ तर यामध्ये राजामौली रेड आणि ग्रे मफलरसह खाकी रंगाच्या पॅंट आणि ब्राउन कलरचा कुर्ता घातलेले दिसले.
राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या शिवाय,’आरआरआर’ मध्ये अजय देवगन, आलिया भट, श्रिया सरन, समुथिरकानी, रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिसही आहे. हा चित्रपट दोन वास्तविक जीवनातील भारतीय क्रांतिकारक, अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या काल्पनिक मैत्री आणि ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या त्यांच्या लढ्याभोवती केंद्रित आहे.