Sachin Pilgaonkar : माझी बुद्धी तल्लख म्हणून…, स्मरणशक्तीवर प्रश्न विचारताच सचिन पिळगावकर स्पष्टच म्हणाले

Sachin Pilgaonkar : मराठी चित्रपटासह बॉलिवूडमध्ये देखील आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर यांनी

  • Written By: Published:
Sachin Pilgaonkar

Sachin Pilgaonkar : मराठी चित्रपटासह बॉलिवूडमध्ये देखील आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात एन्ट्री केली होती. तेव्हापासून आतापर्यंत सचिन पिळगावकर अभिनयक्षेत्रात सक्रिय आहे. ‘नादिया के पार’, ‘बालिका वधू’, ‘अखियो के झारोंखो से’, ‘शोले’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘गंमत जंमत’, यांसारख्या गाजलेल्या हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये सचिन पिळगावकर यांनी काम केलं आहे.

सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले असल्याने आज त्यांच्याकडे असंख्य आठवणी जमा झाल्या आहे. या आठवणी सचिन पिळगावकर विविध मुलाखतींमधून सांगत असतात. नुकतंच त्यांनी स्वत:च्या स्मरणशक्तीबद्दल एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नुकतंच रेडिओ सिटी मराठीला मुलाखत दिली होती.

या मुलाखतीमध्ये सचिन पिळगावकर यांना तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी कशा लक्षात राहतात? असं प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले की, मी त्याच्यासोबतचं जन्माला आलोय, असं म्हणू शकतो आपण. माझी बुद्धी तल्लख आहे आणि ती फार चांगली गोष्ट आहे असं म्हणता येणार नाही. कारण सगळ्याच गोष्टी लक्षात राहतात त्यामुळे मी खूप सहजपणे माफ करु शकतो, पण मी कधीच काहीच विसरु शकत नाही आणि ही खूपच चांगली गोष्ट आहे असं मला वाटत नाही. कारण त्याने खूप त्रास होतो असं अभिनेता सचिन पिळगावकर म्हणाले.

पुढे बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले की, तसं बघायला गेलं तर त्याचे फायदेसुद्धा खूप आहेत. कारण ह्या गोष्ट्र लक्षात राहणं आणि ते लक्षात ठेऊन त्या वेळेवर ते डोक्यात येणं ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे बऱ्याच क्षुल्लक गोष्टी लक्षात राहतात असं देखील सचिन पिळगावकर म्हणाले. तर दुसरीकडे या मुलाखतीमध्ये सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा विकत घेतेल्या गाडीचा किस्सा देखील चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

‘बोलविता धनी’: हृषिकेश जोशींच्या लेखणीतील नव्या नाटकासाठी क्षितिज दाते सज्ज!

यावेळी सचिन पिळगावकर म्हणाले की, मी 9 वर्षांचा होतो, त्यावेळी आताचा हा सी-लिंक नव्हता. मी तेव्हा टायकल वाडी इथे राहायचो. टायकलवाडी शिवाजी पार्क इथे येतं. मी ९ वर्षांचा होतो तेव्हा मी पहिली गाडी खरेदी केली होती. तिला मॉरिस माइनर बेबी हिंदुस्थान म्हणायचे. या गाडीला बकेट सीट आणि फ्लोअर शिफ्ट गिअर होते. ही पेट्रोलवर धावणारी गाडी होती. मी 9 वर्षांचा असताना याच वरळी सीफेसवर त्या गाडीमधून गाडी चालवायला शिकलो असं सचिन पिळगावकर म्हणाले.

follow us