Saif Ali Khan Attack Case : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) काही दिवसांपूर्वी चाकूने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी (Police) कारवाई करत एका बांगलादेशी आरोपीला अटक केली आहे. मात्र मुंबई पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, सैफच्या घरातून सापडलेले फिंगरप्रिंट (Fingerprint) अटकेत असणाऱ्या आरोपी बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लामच्या (Shariful Islam) फिंगरप्रिंटची जुळत नसल्याचा दावा काही मीडिया रिपोर्टसमध्ये करण्यात येत आहे. सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणात पोलिसांनी 16 जानेवारी रोजी शरीफुल इस्लाम या आरोपीला अटक केली होती. तीन दिवस शोध घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती मात्र त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV footage) दिसणारा आरोपी आणि शरीफुल इस्लामचा चेहरा मिळत नसल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत होता.
ताज्या अहवालानुसार सैफच्या घरातून 19 फिंगरप्रिंट्स मिळाले होते मात्र त्यापैकी एकही शरीफुलच्या फिंगरप्रिंटशी मिळत नाही. सीआयडीच्या (CID) अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीआयडीकडून शरीफुलच्या फिंगरप्रिंट घेण्यात आले होते मात्र सैफच्या घरात सापडलेल्या फिंगरप्रिंटशी जुळत नाही. अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता हायप्रोफाईल प्रकरणात पोलिसांनी खरंच आरोपीला अटक केली आहे का? असा प्रश्न आता सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत आहे.
अहवालात म्हटले आहे की, ज्या पथकाने शरीफुलला अटक केली होती त्यांना या प्रकरणाबद्दल फारच कमी माहिती होती. सुरुवातीला हे प्रकरण झोन 9 पोलिस हाताळत होते, परंतु नंतर झोन 6 ची एक टीम शरीफुलला अटक करण्यासाठी पाठवण्यात आली कारण ती जागा शरीफुलच्या संशयित लपण्याच्या ठिकाणाजवळ होती.
ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वरांची पदवी अन् बाबा बागेश्वर नाराज, म्हणाले, ज्याच्या मनात …
शरीफुलच्या अटकेनंतर पोलिसांनी जारी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर सैफच्या अपार्टमेंटच्या पायऱ्यांवरून बाहेर पडताना दिसत आहे. पण हे फुटेज खूपच अस्पष्ट होते, त्यामुळे त्याचा फोटो स्पष्ट दिसत नव्हता. यानंतर पश्चिम रेल्वेने तयार केलेल्या चेहऱ्याच्या ओळखीचा अहवाल वापरण्यात आला, परंतु या अहवालात दाखवलेली व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीशी जुळत नव्हती. या सर्वांमुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.